वुप्पी... १६ मेपासून साराभाई V/S साराभाई तुमच्या भेटीला

  Mumbai
  वुप्पी... १६ मेपासून साराभाई V/S साराभाई तुमच्या भेटीला
  मुंबई  -  

  प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी विनोदी मालिका साराभाई V/S साराभाई मे महिन्यात येणार आहे हे सर्वांना माहितच आहे. पण ही मालिका कधी आणि केव्हापासून पाहता येणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आता जास्त वाट पाहायची गरज नाही. कारण ज्या मालिकेची तुम्ही एवढ्या आतुरतेने वाट पाहात आहात ती मालिका १६ मे पासून तुमच्या भेटीला येणार आहे. हे ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आलं असेल. साराभाई V/S साराभाईच्या प्रॉडक्शन टीमकडून अधिकृतरित्या हे जाहीर केलं नाही आहे. पण पिंकविलानं दिलेल्या रिपोर्टनुसार १६ मेला हॉटस्टार या ऑनलाईन चॅनलवर ही मालिका पुन्हा सुरू होत आहे.

  साराभाई V/S साराभाईचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. या प्रोमोत साराभाई V/S साराभाईच्या नावावरून कुटुंबात सुरू असलेली चर्चा दाखवण्यात आली आहे. नव्या सिरीजचं काय नाव ठेवता येईल, यासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती आपापल्या आयडिया देत असतो. प्रामोवरून तरी साराभाई V/S साराभाई सिरीजमधील किस्से नवीन असले तरी कुटुंबात तेच वातावरण पाहायला मिळणार आहे.

  साराभाई V/S साराभाई मालिका पुन्हा सुरू होत आहे. पण या वेळी सर्वांचे काय रोल असतील? आणखी कोणती नवीन भूमिका पाहायला मिळणार आहे? याचे सर्वांनाच कुतुहूल आहे. पण या मालिकेतील प्रसिद्ध व्यक्तीरेखा म्हणजेच माया, इंद्रवदन, मोनिषा, साहिल, रोसेश, मधु फूफा, दुष्यंत या व्यक्तीरेखाच पाहायला मिळतील. कारण यातील कोणतीही व्यक्तीरेखा नसेल तर साराभाई V/S साराभाई पूर्णच होऊ शकत नाही, असा विचार मालिका निर्माते आतीश कपाडिया यांचा आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.