Advertisement

‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे पोस्टर लाँच...


‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे पोस्टर लाँच...
SHARES

विषयांचे वैविध्य असलेल्या मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. काही सिनेमांच्या नावानेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण होऊ लागते. ‘Thank U विठ्ठला’ हे त्यातल्याच एका  सिनेमाचं नाव! लवकरच ‘Thank U विठ्ठला’ या नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळे, गौरव काळे व अंजली सिंग यांची असून कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचं आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.



प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेला आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा पहाता येईल.



महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे, दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौगुले, जयवंत वाडकर यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा