नाटकवेड्या रसिकांसाठी प्रयोगोत्सव 2017

दादर - महाराष्ट्रातल्या नाटकवेड्या रसिकांसाठी गेल्या वर्षभरात गाजलेल्या सर्वोत्कृष्ट एकांकिका पहाण्याची संधी गुरुवारी रविंद्र नाट्य मंदिरात इलेवन्थ अवर प्रोडक्शनच्या माध्यमातून मुंबईकरांना मिळाली. प्रयोगोत्सव महोत्सवाच्या माध्यमातून या गाजलेल्या एकांकिका मुंबईकरांपर्यंत पोहोचल्या. यामध्ये मुंबई लाइव्ह प्रयोगोत्सवचं वेब मीडिया पार्टनर होतं. 2016 या वर्षात महाराष्ट्रात गाजलेल्या 6 एकांकिकांचे प्रयोग यात सादर करण्यात आले.

सिने-नाट्य सृष्टीत वैयक्तिकरित्या मोठं यश संपादन केल्यानंतर काही ध्येयवेड्या नाटककार कलाकारांनी एकत्र येवून इलेवन्थ अवर प्रोडक्शन या संस्थेची स्थापना केली. ज्येष्ठ रंगकर्मींच्या मार्गदर्शनात नव्या तरुणाईला, नव्या कलागुणांना, नव्या कलाकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा इलेवन्थ अवर प्रोडक्शनचा प्रयत्न आहे.

Loading Comments