प्रिन्स नरुलाने केलं गुपित उघड


SHARE

एम टीव्ही रोडीज, स्प्लिट्सव्हिला, आणि बिग बॉस ९ चा विनर प्रिन्स नरूला याने चाहत्यांसाठी एक खूषखबर दिली आहे. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय जोडी प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी हे दोघेही एन्गेज्ड झाल्याचे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितलं. गेल्या बऱ्यांच दिवसांपासून आपल्या रिलेशनशिपबबात त्यांनी गुप्तता पाळली होती. अखेर प्रिन्स आणि युविकाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. आपल्या हातातील आंगठी दाखवत त्यांनी आपण एन्गेज्ड असल्याचं चाहत्यांना सांगितलं आहे.

यापूर्वी प्रिन्सने कधीच आपल्या नात्याची उघडपणे कबुली दिली नव्हती. प्रिन्स आणि युविका बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यामुळे अनेकवेळा ते रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवाही पसरल्या होत्या.

एमटीव्ही रोडीज, स्प्लिट्सव्हिला, आणि बिग बॉस सीझन ९ हे रिअॅलिटी शो जिंकल्यानंतर फार कमी वेळात त्याने या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण केले. बडो बहू या मालिकेमध्ये प्रिन्सच्या कामाची चांगलीच चर्चा झाली. यामुळे तो उत्तम अभिनेता म्हणून नावारूपास आला.

मात्र आता पहिल्यांदाच प्रिन्स उघ़डपणे आपल्या नात्यावर बोलला आहे. त्याने युविका बरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्याने 'मेहंदी लगा के रखना, डोली सजाके रखना, लेने तुझे गोरी आयेंगे प्रिन्स'. असं सुंदर कॅप्शन देत त्याने युविकाचे आभार मानले. त्याच्या या पोस्टनंतर विकास गुप्ता, रणविजय सिंघा,  नेहा धुपिया यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.


तर युविकाने या नात्याला दुजोरा दिला आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबदद्ल तुझे आभार ..ही नवी सुरूवात कायमच माझ्या लक्षात राहील असे म्हणत तीने तीचा आणि प्रिन्सचा सुंदर फोटो शेअर केला आहे.


संबंधित विषय
ताज्या बातम्या