Advertisement

प्रिया वरियार करते नजरेने घायाळ! आधी व्हिडिओ, आता फोटो व्हायरल!


प्रिया वरियार करते नजरेने घायाळ! आधी व्हिडिओ, आता फोटो व्हायरल!
SHARES

प्रिया प्रकाश वरियर या मुलीने आणि तिच्या डोळ्यांच्या अदाकारीने अवघ्या ८ तासांमध्ये सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्यानंतर आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.




प्रिया प्रकाश वरियरचा ओरू अडार लव्ह हा चित्रपट येत्या ३ मार्चला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट जरी मल्याळम असला, तरी त्या चित्रपटातलं एक गाणं सध्या संपूर्ण भारतात व्हायरल होत आहे. आणि त्याला कारण आहे प्रिया प्रकाश वरियरच्या डोळ्यांची दिलखेचक अदाकारी!


तिच्या या डोळ्यांच्या लकबीमुळे अवघ्या काही तासांमध्येच इन्स्टाग्रामवर तिला ४ लाख फॉलोअर्स मिळाले, तर फेसबुकवर तब्बल ५० हजार लाइक्स! तिच्या याच गाण्यातल्या व्हिडिओमुळे आता तिचे पोर्टफोलिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.







हेही वाचा

अवघ्या ८ तासांत तिच्या डोळ्यांनी धुमाकूळ घातला!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा