Advertisement

प्रियंका चोप्रा झाली आई, जोनस कुटुंबाकडून बाळाचं स्वागत

शनिवारी सोशल मीडियावर दोघांनी ही बातमी जाहीर केली.

प्रियंका चोप्रा झाली आई, जोनस कुटुंबाकडून बाळाचं स्वागत
SHARES

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनास आता एका बाळाचे पालक झाले आहेत. सरोगसीद्वारे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास आई-वडील झाले आहेत. 

शनिवारी सोशल मीडियावर दोघांनी ही बातमी जाहीर केली. त्यांचे चाहते त्यांचे अभिनंदन करत आहेत. अनेक सेलिब्रिटींकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


प्रियांका आणि निक यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बाळाबाबत उघडपणे सांगितले नाही. त्यांनी पोस्ट फक्त म्हटलं आहे की, "आम्ही सरोगेटद्वारे बाळाचे स्वागत केले आहे. हे सांगताना आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे आम्ही आदरपूर्वक गोपनीयतेची विनंती करतो. खूप खूप धन्यवाद."

डिसेंबर 2018 मध्ये निक आणि प्रियांकाचे लग्न झाले. या जोडप्याने लवकरच पालक बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी बाळाचे स्वागत केल्याची बातमी जगभरातील चाहत्यांसाठी आश्चर्यचकित करणारी आहे. नवीन पालकांना आमचे अभिनंदन!

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा