Advertisement

प्रियांकाच्या आवाजातलं 'बाबा' गाणं ...


SHARES

मुंबई - बॉलिवु़डची लाडकी पिगी चॉप्स...अर्थात प्रियांका चोप्रा...प्रियांकाच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे..पण पिगीचॉप्सचं वेगळं रूप तिच्या चाहत्यांसमोर आलं आहे..आणि ते म्हणजे सिंगर प्रियांका...आता तुम्ही म्हणाल की प्रियांकानं याआधीहीअनेक गाणी गायिली आहेत..पण आता प्रियांकानं चक्क मराठीत गाणं गायलंय...

'व्हेंटिलेटर'...प्रियांकानं स्वत: प्रोड्युस केलेला आणि गाणं गायलेला हा पहिला सिनेमा...ह्या सिनेमाची अगदी टीजर पासूनच बरीच चर्चा झाली होती...पण त्यातही चर्चा आहे या गाण्याची..अवघ्या काही तासातच प्रियांकाच्या आवाजातलं हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं.

व्हेंटिलेटर’ हा सिनेमा एक फॅमिली ड्रामा असून या सिनेमात मराठीतील १०० हून अधिक कलाकार आहेत. तसंच तब्बल १८ वर्षांनंतर दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे भूमिका साकारतायत.

तगडे कलाकार, धमाल स्टोरी आणि अर्थात प्रियांका चोप्रा ह्या केमिस्ट्रीमुळे व्हेंटिलेटरला चांगलाच तडका मिळालाय

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा