लक्षवेधी प्रियंका

 Pali Hill
लक्षवेधी प्रियंका
लक्षवेधी प्रियंका
लक्षवेधी प्रियंका
See all
Pali Hill, Mumbai  -  

मुंबई - गोल्डन ग्लोब 2017 या पुरस्काराची घोषणा रविवारी कॅलिफोर्नियात झाली. या वेळी हॉलीवू़ड अभिनेत्री अॅमा स्टोन, बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यासह अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. स्टायलिश पेहराव केलेल्या या सर्व सेलिब्रिटींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. पण यंदा डीप नेकलाइन असलेला गोल्डन गाऊन घातलेल्या प्रियंकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं. त्याची चर्चाही सर्वत्र रंगली. या पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान 'फोर ब्रदर्स', 'न्यू इयर्स इव्ह' 'अॅस्केप फ्रॉम प्लानेट अर्थ' या चित्रपटात अभिनय केलेल्या अमेरिकन अभिनेत्री सोफिया वरजारा हिनेही प्रियंकासारखाच पेहराव केला होता. 44 वर्षांच्या सोफियाचा ड्रेस जुहैर मुराद या डिझायनरने डिझाइन केला होता.

Loading Comments