Advertisement

सुनील बर्वेंचा हर्बेरियम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!


सुनील बर्वेंचा हर्बेरियम पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
SHARES

पाच वर्षांपूर्वी 'सुबक' या संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुनील बर्वे यांनी हाती घेतला होता. आता पुन्हा एकदा 'हर्बेरियम' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालं आहे. आजच्या तरुण पिढीला या नाटकांची माहिती व्हावी आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके पुन्हा पहाता यावीत, या उद्देशाने सुनील बर्वे यांनी हा उपक्रम राबविला होता. 

या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यावेळी ‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच नाटकांचा ‘हर्बेरियम २०१२'मध्ये समावेश होता. आता पुन्हा ‘हर्बेरियम’मध्ये कोणत्या नाटकांचा समावेश असेल याची उत्सुकता सर्वांनाच होती.नुकतीच सुनील बर्वे यांनी ‘हर्बेरियम’ च्या दुसऱ्या पर्वाची घोषणा केली. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर लिखित ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने ‘हर्बेरियम’ च्य नव्या पर्वाची सुरुवात होणार असून या नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत. या पर्वातही पाच नाटकं असून विजय केंकरे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे या मातब्बर दिग्दर्शकांची नाटकं या पर्वात सादर होणार आहेत. मुंबई व महाराष्ट्रात या नाटकांचे प्रयोग रंगतील, असंही सुनील बर्वे सांगितलं. ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी या कलावंतांसह धनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव हे दोन नव्या दमाचे गायक कलावंत भूमिका साकारणार आहेत.उरलेल्या चार नाटकांची नावं सध्या तरी गुलदस्त्यात ठेवली असून लवकरच त्याची घोषणा करण्यात येणार आहे. ‘पती गेले गं काठेवाडी’चा पहिला प्रयोग शनिवारी २३ सप्टेंबरला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दुपारी ४.०० वाजता रंगणार आहे.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement