बिग बॉसमध्ये राहुल 'राज' ?


SHARE

मुंबई - प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंह पुन्हा चर्चेत यायला लागलाय. मात्र यावेळी तो वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. प्रत्युषा प्रकरणाच्या कॉन्ट्रोवर्सीनंतर राहुल राज बिग बॉसमध्ये जाणार अशी चर्चा आहे. प्रत्युषा बॅनर्जी प्रकरणानंतर राहुल राजवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे राहुल राज हे सर्व प्रसिद्धीसाठी करत असल्याचं बोललं जातंय. आता तो खंरच बिग बॉसमध्ये आहे की नाही ते १६ ऑक्टोबरला सर्वांनाच कळेल.

संबंधित विषय
ताज्या बातम्या