Advertisement

राकेश रोशन यांची संन्यासाची धमकी...


राकेश रोशन यांची संन्यासाची धमकी...
SHARES

मुंबई - 'हिंदी चित्रपटसृष्टीत तब्बल पाच दशके घालवल्यानंतर मी आता इथं एकटा पडलो आहे. सध्या चित्रपटसृष्टीत जे खेळ खेळले जात आहेत, तशाप्रकारचे खेळ मी खेळू शकत नाही. हृतिक आणि मी खूप साधी माणसं आहोत. काबील आणि रईसला निम्मे निम्मे स्क्रीन्स देण्याचं आश्वासन वितरकांनी दिलं होतं. ते त्यांनी न पाळता आम्हांला केवळ 40 टक्केच स्क्रीन्स दिले. पाठीत खंजीर खुपसण्याचे हे प्रकार यापुढेही असेच चालत राहिले तर मी या चित्रपटसृष्टीतून बाहेर पडेन.` अशी धमकी प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक राकेश रोशन यांनी दिली आहे. गेल्या 25 तारखेला राकेश रोशन यांची निर्मिती आणि हृतिक रोशनची प्रमुख भूमिका असलेला काबील चित्रपट प्रदर्शित झाला. याच दिवशी शाहरुखची निर्मिती आणि अभिनय असलेला रईस चित्रपटही प्रदर्शित झाला. या दोन चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर तुंबळ युद्ध होणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत ऐकायला मिळत होती. राकेश रोशन यांच्या या धमकीमुळे ही चर्चा खरी ठरण्याची चिन्हं दिसत आहेत.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी रईसनं 20 कोटी तर काबीलनं 10 कोटी व्यवसाय केला. दुसऱ्या दिवशी रईसला 26 कोटी तर काबीलला 20 कोटी व्यवसाय करता आला आहे. त्यामुळे या दोन मोठ्या चित्रपटांच्या लढाईत रईसनं बाजी मारल्याची चर्चा सुरू झाली. या चर्चेवरूनच नाराज झालेल्या रोशन यांनी अशा प्रकारची टीका केली आहे. रोशन यांच्या म्हणण्यानुसार वितरकांनी देशभरातील 50 टक्के मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहे देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. काबीलला अवघे 40 टक्केच स्क्रीन्स मिळाले आणि त्यामुळेच या चित्रपटाचे पहिल्या काही दिवसांमधील उत्पन्न रईसच्या तुलनेत कमी आहे. रोशन यांनी शाहरुख खानचं थेट नाव घेतलेलं नसलं तरी त्यांच्या टीकेचा रोख त्याच्यावरच आहे. कारण रईस`ची निर्मिती शाहरुखनंच केली आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा