पतौडींवरील चित्रपटासाठी रणबीर कपूर फर्स्ट चॉईस

  Pali Hill
  पतौडींवरील चित्रपटासाठी रणबीर कपूर फर्स्ट चॉईस
  मुंबई  -  

  मुंबई - सध्या स्पोर्टस पर्सनॅलिटीवर चित्रपट बनण्याचे दिवस आहेत. महावीर फोगट यांच्यावरील `दंगल' सुपरडुपर हिट ठरल्यानंतर आता कोणावर चित्रपट बनणार याचे प्रेक्षकांना वेध लागले आहेत. चित्रपटसृष्टीतील ताज्या माहितीनुसार विख्यात क्रिकेटपटू मन्सूर अली खान पतौडी यांच्यावर चित्रपट बनवण्याची इच्छा खुद्द सैफ अली खाननेच व्यक्त केली आहे. मात्र आपल्या वडिलांच्या व्यक्तिरेखेला आपण न्याय देऊ शकू की नाही, याबाबत खुद्द सैफच्याच मनात शंका असल्यामुळे हा चित्रपट अजूनतरी कागदावरच आहे. विशेष म्हणजे शर्मिला टागोर यांना आपल्या पतीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सैफच्या तुलनेत रणबीर कपूर अधिक योग्य वाटत आहे. मात्र रणबीरला क्रिकेट आवडत नसल्यामुळे सैफची त्याच्या नावाला नापसंती आहे. पाहूया या भूमिकेची माळ कोणाच्या गळ्यात पडते ते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.