Advertisement

का आहे राणी सोशल मीडियापासून दूर?


का आहे राणी सोशल मीडियापासून दूर?
SHARES

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी गेल्या 2 वर्षांपासून कोणत्याच चित्रपटात दिसली नाही. तसेच राणी मुखर्जी सोशल मीडियाच्या साईटवर देखील दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडला असेल राणी मुखर्जी नेमकं करतेय तरी काय? याचं उत्तर खुद्द राणी मुखर्जी हिनेच दिले आहे. राणी मुखर्जी सध्या मातृत्वाचे सुख अनुभवत आहे. 2015 मध्ये राणी मुखर्जीने आदीराला जन्म दिला. तेव्हापासून ती तिच्यातच गुंतली आहे. 21 मार्चला राणीने आपला 39 वाढदिवस साजरा केला तेव्हा तिने आपल्या चाहत्यांना फेसबुकवर हे सांगितले. 2014 मध्ये राणी मुखर्जी हिचं आदीत्य चोपडासोबत लग्न झालं. त्यानंतर 2105 ला तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. राणी मुखर्जीने सांगितले की मी आणि माझे खासगी आयुष्य सोशल मीडियावर टाकणं मला आवडत नाही. 

संबंधित विषय
Advertisement