Advertisement

विजयादशमीच्या मुहूर्तावर येणार मतकरींचं ‘आरण्यक’


विजयादशमीच्या मुहूर्तावर येणार मतकरींचं ‘आरण्यक’
SHARES

ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी लिखित ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटक मराठी रंगभूमी गाजवत असताना मतकरींचंच ‘आरण्यक’ हे आणखी एक जुनं नाटक नव्या रूपात रंगभूमीवर येणार आहे.


भूतकाळातील नाटकं पाहण्याची संधी

सुनील बर्वेच्या ‘हर्बेरीयम’नंतर पुन्हा एकदा मराठी दिग्दर्शकांना जुन्या नाटकांचे वेध लागले. मध्यंतरी यात थोडा खंड पडला होता. पण आता पुन्हा एकदा नव्याने हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्यामुळे आजच्या पिढीला भूतकाळातील गाजलेली नाटकं पाहण्याची संधी मिळत आहे. ‘आरण्यक’ हे त्यापैकीच एक नाटक आहे. विजयादशमीच्या मुहूर्तावर म्हणजेच १८ आक्टोबरला हे नाटक नव्या संचात रसिकांच्या भेटीला येणार आहे.

महाभारतातील कथेवर 

हे नाटक महाभारतातील पौराणिक कथेवर आधारित आहे. गूढ कथांनी वाचकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी ठरलेल्या मतकरींसारख्या लेखकाच्या लेखणीतून अवतरल्याने याला वेगळंच महत्त्व प्राप्त झालं आहे. १९७४ मध्ये सर्वप्रथम हे नाटक रंगभूमीवर सादर करण्यात आलं होतं. धृतराष्ट्र, कुंती, गांधारी, युधिष्ठीर या महाभारतातील व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेल्या नाटकात त्या काळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर तसंच रवी पटवर्धन यांनीही काम केलं होतं. नवीन संचातील नाटकातही प्रभावळकर आणि पटवर्धन काम करणार असल्याचं समजतं. त्यासाठी दोघांनीही तालिमीही सुरू केल्या असल्याची माहिती मिळाली आहे.


जुने आणि नवे कलाकार

‘आरण्यक’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणताना त्यात काळानुरूप काही बदल आणि काटछाटही करण्यात आली असल्याचं समजतं. अद्वैत या नाट्यनिर्मिती संस्थेत राहुल भंडारे यांनी नाटकाची निर्मिती केली असून, झी मराठीची प्रस्तुती या नाटकाला लाभली आहे. या नाटकात जुन्या आणि नव्या कलाकारांची फळी काम करणार आहे.



हेही वाचा - 

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा

मांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा