Advertisement

दुसऱ्या 'मोगली'च्या ट्रेलरचा युट्यूबवर धुमाकूळ!


दुसऱ्या 'मोगली'च्या ट्रेलरचा युट्यूबवर धुमाकूळ!
SHARES

'मोगली द जंगल बुक' या चित्रपटाने २०१६मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये धम्माल केल्यानंतर आता पुन्हा एकदा मोगली भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर यूट्यूब आणि सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालत आहे. २१ मे रोजी रिलीज झालेल्या या ट्रेलरच्या व्हिडिओ आत्तापर्यंत ७० लाख ५१ हजार हिट्स मिळाले आहे. यूट्यूबवर हा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.



अॅण्डी सरकीस यांचं दिग्दर्शन

प्रसिद्ध हॉलिवूड दिग्दर्शक अॅण्डी सरकीस यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. भारतीय जंगलांमध्ये हा चित्रपट शूट करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध लेखक रुडयार्ड किपलिंग यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. जंगली प्राण्यांसोबत लहानाचा मोठा झालेल्या 'मोगली' या पात्रावर ही कथा आधारित आहे.



रोहन चंदने साकारली मोगलीची भूमिका

रोहन चंद या मुलाने चित्रपटात 'मोगली'ची भूमिका साकारली आहे. मात्र, आधीच्या 'मोगली'पेक्षा या चित्रपटाची कथा वेगळी असणार आहे. या चित्रपटामध्ये मोगली वाईट माणसांशी लढताना दिसणार आहे. मात्र, या चित्रपटातही शेरखानशी लढण्यासाठी बघिरा आणि बल्लू असणार आहेत. हा चित्रपटही अॅनिमेशन प्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.



१९ ऑक्टोबरला होणार प्रदर्शित

अॅण्डी सरकीस दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटाची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स करत आहेत. १९ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

होय, बाॅलिवूडमध्ये होतं कास्टिंग काऊच- आलिया भट


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा