Advertisement

होय, बाॅलिवूडमध्ये होतं कास्टिंग काऊच- आलिया भट

नवीन कलाकारांनी कठीण प्रसंगावर मात करत आणि स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवून काम करायला हवं. म्हणजे ते अशा प्रकारांना बळी पडणार नाहीत. आणि दुर्दैवाने त्यांच्यावर अशी वेळ आलीच, तर त्वरीत पोलिसांशी संपर्क साधून अन्यायाविरोधात दाद मागायला हवी, असं आलिका म्हणाली.

होय, बाॅलिवूडमध्ये होतं कास्टिंग काऊच- आलिया भट
SHARES

बाॅलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काऊचचा मुद्दा खूपच चर्चेत आहे. या मुद्द्यावर अभिनेत्री स्वरा भास्कर, रिचा चढ्ढा, राधिका आपटे या नव्या पिढीतील सेलिब्रिटींसोबत इतर अभिनेत्रींनीही आपल्यावरील अन्यायाला जाहीरपणे वाचा फोडली. त्यात आता आलिय भटचंही नाव सामील झालं आहे.


'राजी' हिट

बाॅलिवूडमधील टॅलेंटेड गर्ल म्हणून परिचित असलेल्या आलियानेही इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच होत असल्याचं मान्य केलं आहे. आलियाचा 'राझी' हा सिनेमा सध्या बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घालत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शीत 'राजी'ने आतापर्यंत ७० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्याचवेळेस आलियाने केलेल्या या वक्तव्याने सगळ्यांच्या नजरा तिच्यावर रोखल्या गेल्या आहेत.काय म्हणाली आलिया?

मी स्वत: कास्टिंग काऊचचा बळी ठरले नसले, तरी बाॅलिवूडमध्ये सर्रासपणे कास्टिंग काऊच होतं. काहीजण नवीन कलाकारांना इंडस्ट्रीत काम मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांचा गैरफायदा घेतात.


प्रतिभेवर विश्वास ठेवा

काहीही असलं, तर नवीन कलाकारांनी कठीण प्रसंगावर मात करत आणि स्वत:च्या प्रतिभेवर विश्वास ठेवून काम करायला हवं. म्हणजे ते अशा प्रकारांना बळी पडणार नाहीत. आणि दुर्दैवाने त्यांच्यावर अशी वेळ आलीच, तर त्वरीत पोलिसांशी संपर्क साधून अन्यायाविरोधात दाद मागायला हवी.हेही वाचा-

रणबीर म्हणतो 'आलिया माझी क्रश'

काय आहे 'संजू'च्या टीझरमध्ये? बघाRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा