Advertisement

सोनू निगम, श्रेया घोशाल आणि अमितराज पहिल्यांदाच एकत्र!


सोनू निगम, श्रेया घोशाल आणि अमितराज पहिल्यांदाच एकत्र!
SHARES

'देवा' या बहुचर्चित सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'रोज रोज नव्याने' हे गाणे लाँच झाले. सिनेमाच्या टीझरने वाढवलेली प्रेक्षकांची उत्सुकता आता या गाण्यामुळे अधिकच वाढेल यात शंका नाही. हल्ली बरेच हिंदी गायकांचे आवाज मराठी सिनेमातील गाण्यांना लाभत आहेत. मुरली नलप्पा दिग्दर्शित 'देवा' सिनेमातील या रॉमेंटिक गाण्याला सोनु निगम आणि श्रेया घोषाल या हिंदीच्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज लाभला आहे.

 


प्रेमाच्या श्रवणीय जगात घेऊन जाणारे हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून संगीत दिग्दर्शक अमितराज यांनी या गाण्याला चाल दिली आहे. विशेष म्हणजे, 'रोज रोज नव्याने' या गाण्यामार्फत सोनू, श्रेया आणि अमितराज ही संगीत विश्वातील जोडी प्रथमच 'देवा' या सिनेमातून एकत्र आली आहे.प्रेमी युगुलांना पर्वणी ठरत असलेले हे गाणे, श्रेयालादेखील पसंत असून, हे गाणे माझे फेव्हरेट साँग असल्याचे ती सांगते. येत्या १ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटात अंकुश -तेजस्विनीबरोबरच डॉ. मोहन आगाशे, वैभव मांगले, पंढरीनाथ कांबळे, मयूर पवार हे कलाकारदेखील आपणास पाहायला मिळणार आहेत.हेही वाचा

सोनाली, प्राजक्ताच्या 'हंपी'चा ट्रेलर लॉन्च!


संबंधित विषय
Advertisement