Advertisement

सोनाली, प्राजक्ताच्या 'हंपी'चा ट्रेलर लॉन्च!


सोनाली, प्राजक्ताच्या 'हंपी'चा ट्रेलर लॉन्च!
SHARES

गेले  काही दिवस ज्युनिअर सोनाली कुलकर्णी आणि ललित प्रभाकर यांची जोडी असलेला 'हंपी' या सिनेमाची बरीच चर्चा रंगली होती. आणि फायनली या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. चित्रपटात निराशाग्रस्त ईशा (सोनाली कुलकर्णी) ट्रिप म्हणून हंपीला येते आणि तिचं आयुष्यच आमूलाग्र बदलतं. मुळात ती हंपीला का जाते? तिथे ती काय करते? तिला तिथे कोण आणि कसे लोक भेटतात? ईशा, हंपी मधल्या माणसांमुळे बदलते की हंपी मुळे बदलते? हा कुतूहलाचा विषय जरी असला, तरी world heritage चा दर्जा असलेले हंपी हे ठिकाण कोणालाही प्रेमात पडायला लावणारे आहे.



हंपीची सुंदर कथा-पटकथा-संवाद प्रकाश कुंटे यांच्या दिग्दर्शनातून उलगडत जाणार आहे. 'कॉफी आणि बरंच काही', '& जरा हटके', या सिनेमांनंतर प्रकाश कुंटे 'हंपी' हा सिनेमा घेऊन येत आहेत.



हंपी या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, प्रियदर्शन जाधव, प्राजक्ता माळी, ललित प्रभाकर, छाया कदम अशी तगडी आणि ग्लॅमरस स्टारकास्ट आहे. येत्या १७ नोव्हेंबरला हंपी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल आणि प्रेक्षकांना पाहता पाहता हंपीला घेऊन जाईल!



हेही वाचा

न्यूड...रवी जाधवचा वेगळ्या धाटणीचा चित्रपट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा