Advertisement

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलनं शाही कुटुंबाविरोधात केले 'हे' ७ खळबळजनक आरोप

हॅरी आणि मेगन मर्कलनं शाही परिवाविरोधात ७ खळबळजनक आरोप जगासमोर मांडले आहेत.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलनं शाही कुटुंबाविरोधात केले 'हे' ७ खळबळजनक आरोप
SHARES

ब्रिटनचे राजकुमार हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मर्कल (Meghan Markle) यांनी मागच्या वर्षी शाही परिवार सोडल्याची घोषणा केली होती.

आता नुकतेच प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी टीव्हीवरील प्रसिद्ध व्यक्तिमत्व ओप्रा विन्फ्रेला (Oprah Winfrey) मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

अमेरिकन वृत्तवाहिनी सीबीएसवर ही मुलाखत प्रसारित झाली. मेगन मार्कलनं शाही परिवारावर एक प्रकारे अनेक आरोप केले आहेत. मुलाखती दरम्यान, मेगन मार्कल खूप भावनिक झाली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात तर तिच्या डोळ्यात अश्रू आले. हॅरी आणि मेगन मर्कलनं शाही परिवाविरोधात ५ खळबळजनक आरोप जगासमोर मांडले आहेत.

१) ब्रिटनचे राजकुमार हॅरी (Prince Harry) आणि त्यांची पत्नी मेगन मर्कल यांचं बाळ जन्माला येण्याआधी त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला.

२) मेगनचे वडील गोरे आहेत तर आई अश्वेत आहे. मेगनच्या म्हणण्यानुसार राजघराण्यातील या वर्णभेदामुळे ती इतकी त्रस्त झाली होती की तिनं आत्महत्येसारखे गंभीर पाऊल उचलण्याचा विचारही केला होता.

३) मेगन मार्कल म्हणाली की, जेव्हा ती मानसिक आरोग्याच्या समस्येशी झगडत होती तेव्हा तिला मदत केली गेली नाही.

४) याशिवाय मेगन मार्कल म्हणाली की, राजघराण्यातील लोक तिच्या मुलाला प्रिन्स म्हणून पाहू इच्छित नव्हते. कारण त्यांच्यामते आर्ची हा अश्वेत होता. मात्र, यावेळी मेगननं कुणाचंही नाव घेतलं नाही.

५) तिनं हा पण आरोप केला की, राजघराण्यातील वर्णभेदाविरोधात आवाज उठवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले पण प्रत्येक वेळी मला शांत केलं गेलं.

६) प्रिन्स हॅरीनं सांगितलं की, त्याचे पिता प्रिन्स चार्ल्स हे ब्रिटिश राजघराण्याचे वारस आहेत. मात्र त्यांनी आपला फोन उचलणं थांबवलं होतं आणि आपल्याला कोणतीही आर्थिक मदत केली नव्हती.

७) राजवाड्यात घडलेल्या गोष्टींमुळे तिला अतिशय वाईट वाटत होते आणि तिथे तिला आपलेपणा वाटत नव्हता. म्हणूनच तिनं आणि प्रिन्स हॅरीनं राजघराणं सोडण्याचा निर्णय घेतला.

 


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा