ऑपेरा हाऊसचा 'रॉयल' अंदाज

  मुंबई  -  

  मुंबई - बालगंधर्व, दिनानाथ मंगेशकर, लता मंगेशकर आणि पृथ्वीराज कपूर यांनी एकेकाळी गाजवलेले गिरगावमधील ऐतिहासिक 'ऑपेरा हाऊस' रसिकांसाठी पुन्हा खुले झाले. अगदी आकर्षक अशा नव्या रुपात, नव्या ढंगात ऑपेरा हाऊस थिएटर मुंबईकरांच्या भेटीला आले. आकर्षक आणि अनोख्या पद्धतीची रचना असलेल्या या थिएटरची ही वास्तू ऐतिहासिक काळातील नाटक, कलाकार आणि संगीत मैफिलींची साक्षीदार राहिलीय.

  1908 मध्ये कोलकात्याचा कलाकार मोराइस बॅन्डमन यानं ऑपेरा हाऊस उभारला. 1952मध्ये गोंदालचे महाराज विक्रमसिंह यांनी ऑपेरा हाऊस विकत घेतलं. 2010मध्ये विक्रमसिंह यांचे पुत्र ज्योतिंद्रसिंह यांनी 'ऑपेरा हाऊस'ची पुनःस्थापना केली. या वास्तूची पुर्नबांधणी करताना मुंबईतील ऐतिहासिक ग्रंथालय, अजंठा लेणी, बोध गयासारख्या भारतीय-ब्रिटीश कालीन ऐतिहासिक वास्तूंवरील शिल्पकलेचा अभ्यास करण्यात आला.

  वास्तुविशारद आभा लांबा यांच्या नेतृत्वाखाली सहा वास्तुविशारदांच्या पथकानं गेली आठ वर्ष मेहनत घेतली. या ऐतिहासिक वास्तूला नवे रुप मिळवून दिले आहे. ही वास्तू आता मुंबईकरांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालीय.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.