Advertisement

ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात


ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरुवात
SHARES

माटुंगा- माटुंग्याच्या सांस्कृतिक कला केंद्रात तीन दिवसीय ग्रामीण साहित्य संमेलनाला सुरूवात झालीय. या संमेलनाचे उद्घाटन डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते झाले. हे साहित्य संमेलन 20 नोव्हेंबरपर्यंत सुरु रहाणार असून, हे संमेलन विनामूल्य असणार आहे. गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटात बरेचसे बदल होत गेले आहेत. शहरी आणि ग्रामीण विषय चित्रपटांच्या माध्यमातून हाताळले जाऊ लागलेलेत. त्यामुळे संमेलनाच्या शेवटच्या दिवशी जूनी आणि नवीन ग्रामीण गीतं गायली जाणार आहेत. उद्घाटन समारंभात बोलताना नागनाथ कोतापल्ले यांनी विश्वास पाटील, मर्ढेकर, शंकर पाटील यांसारख्या अनेक कवी लेखकांच्या लेखनाचा उल्लेख केला. यावेळी कोतापल्ले म्हणाले ग्रामीण जीवनाविषयी लेखन करणारे लेखक मराठी साहित्यात प्रचंड प्रमाणात आहेत. ग्रामीण भागात जात, धर्म, राजकारण या विषयांवर जनजागृती होणे आवश्यक असल्याचं ते म्हणालेत. या साहित्य संमेलनात अनेक वेगवेगळ्या विषयांवरील संवादांचे आयोजन देखील करण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा