Advertisement

सचित पाटील प्रथमच दुहेरी भूमिकेत


सचित पाटील प्रथमच दुहेरी भूमिकेत
SHARES

मोठ्या पडद्याकडून छोट्या पडद्याकडे वळलेला सचित पाटील ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचला आहे. या मालिकेच्या निमित्ताने सचित प्रथमच दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.

बरेच खुलासे 

‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेमध्ये मागील काही दिवसांपासून बरेच खुलासे केले जात आहेत. राधा प्रेमच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर तिने अनेक प्रश्न मागे सोडले, घरच्यांसाठी तो एक धक्काच होता. प्रेम त्या धक्क्यामधून कसाबसा सावरत होता कि, देवयानी आणि दीपिकाने त्याला त्यांच्या जाळ्यात आणि कारस्थानामध्ये पूर्णत: अडकवले. परंतु जसजसे दिवस सरत गेले गुंता, प्रश्न सगळे सुटत गेले.


अजून एक ट्वीस्ट 

राधा मेली नसून ती जिवंत आहे. तिच्या पोटामध्ये प्रेमचे मुलं वाढत आहे.  राधा कधीच विपश्यना केंद्रात गेली नसून ती इंदोरमध्ये एका इस्पितळामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. अशा बऱ्याच गोष्टी समोर आल्या. जसाजसा गुंता सुटत गेला प्रेमला राधाविषयीची वाटणारी काळजी वाढत गेली. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत, पण राधा अजूनही भेटली नाही. आता मालिकेमध्ये अजून एक ट्वीस्ट आला असून, कश्यप नांदेची एन्ट्री झाली आहे. सचितच ही भूमिका साकारत आहे. या भुमिकेमध्ये सचित एका वेगळ्या रुपात दिसत आहे. कश्यपच्या येण्याने मालिकेमध्ये काय घडणार? प्रेम आणि राधाच्या नात्याला कोणतं नवं वळण मिळणार? ते पाहायला मिळेल.


पहिल्यांदाच डबल रोल

या मालिकेच्या निमित्ताने पहिल्यांदाच डबल रोल साकारण्याबाबत सचित म्हणाला की, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ या मालिकेनं आता नवं वळण घेतलं आहे. या मालिकेमध्ये मी दुहेरी भुमिकेमध्ये दिसणार आहे. कश्यपची भूमिका मी साकारणार आहे. मी आयुष्यात पहिल्यांदाच डबल रोल साकारत आहे. प्रेम या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता डबल रोल करण्याची संधी मिळली आहे.

रावडी आणि मवाली कश्यप

कश्यपबाबत सचित म्हणाला की, कश्यपची व्यक्तिरेखा प्रेम देशमुखपेक्षा खूपच वेगळी आहे. कश्यप आणि प्रेममध्ये अजिबात साम्य नाही. कश्यप हा रावडी आणि मवाली आहे. तो काही महिन्यात मरणार आहे, ज्याची त्याला अजिबात चिंता नाही. देवयानीमुळे कश्यप राधाच्या आयुष्यात येणार आहे. आता कश्यप नांदे आणि राधा एकत्र येतील, पण पुढे राधाचे काय होईल? हे पाहायला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असंही सचित म्हणाला.



हेही वाचा -

मांजरेकरांच्या सिनेमात सोनल चौहान

शाहरुख-रितेशच्या लढतीला अजय-अतुलचा बँडबाजा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा