Advertisement

महाराष्ट्राच्या फेवरेट 'सई -सोनाली' आता चिंगारी अॅपवर!

मराठी चित्रपटसृष्टीतील दोन विख्यात अभिनेत्री त्यांच्या आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी चिंगारी अॅपवर आल्या आहेत. चिंगारी हे चाहत्यांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम झाले आहे.

महाराष्ट्राच्या फेवरेट 'सई -सोनाली' आता चिंगारी अॅपवर!
SHARES

सेलेब्रिटीज, प्रभावी व्यक्तिमत्वे, उद्योजक आणि अगदी विशिष्ट संस्थांचेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लक्षावधी फॉलोअर्स असतात. मग ते इन्स्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा ट्विटर असो. प्रसिद्ध नावांद्वारे टाकल्या गेलेल्या प्रत्येक पोस्टला हजारो फॉलोअर्स मिळतात. 

प्रख्यात सेलेब्रिटीज त्यांच्या सोशल मीडिया हॅण्ड्ल्सची प्रमोशन करण्यासाठी एक नवीन मार्ग चोखाळत आहेत. 'अप्सरा आली'फेम सोनाली कुलकर्णी आणि 'पुढे धोका आहे'फेम सई ताम्हणकर यांनीही आता हा मार्ग निवडला आहे. या दोन देखण्या अभिनेत्रींनी चिंगारी अॅप या आपल्या मातीत विकसित करण्यात आलेल्या शॉर्ट व्हिडिओ अॅप प्लॅटफॉर्मशी सहयोग केला आहे. 

याद्वारे त्या त्यांचे चित्रपट, इव्हेंट्स, सामाजिक उपक्रम, त्यांच्या आवडी-निवडी या सगळ्याची प्रसिद्धी करणार आहेत. यासोबतच राज्यातील भल्यामोठ्या प्रेक्षकवर्गाशी संवादही साधणार आहेत.   

सई आणि सोनाली या दोघीही त्यांच्या लेटेस्ट अपडेट्स, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज रोज चिंगारी अॅपवर पोस्ट करणार आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला चिंगारीनं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वोत्तम भारतीय अॅप्स प्रकल्प विभागात, ‘आत्मनिर्भर भारत’ नवोन्मेष आव्हान पुरस्कार पटकावला. 

चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी चिंगारी अॅप या अभिनेत्रींच्या मुलाखती दाखवेल, त्या सध्या करत असलेल्या उपक्रमांचे सृजनशील मार्गानं प्रमोशन करेल, हे सर्व रोचक स्वरूपात सादर करेल आणि महाराष्ट्रभरातील त्यांच्या चाहतावर्गाला आकर्षित करून घेईल.

“३४ दशलक्ष डाउनलोड्ससह चिंगारीने महाराष्ट्रात वापरकर्त्यांचा वर्ग चांगलाच विस्तारला आहे. निव्वळ पुण्यातच चिंगारीने २० लाखांपेक्षा जास्त युजरबेस बनवला आहे. या अॅपला महाराष्ट्रीय लोकांकडून दाद मिळत आहे ही एक महाराष्ट्रीय म्हणून माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे,” असेही श्री. दीपक साळवी म्हणाले.  

श्री. दीपक साळवी पुढे म्हणाले, “चिंगारी अॅपने एक रोमांचक पाऊल टाकले आहे आणि त्यामुळे अनेक प्रादेशिक सेलिब्रिटीजना स्वतःची आणि चित्रपटांची प्रसिद्धी करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे चित्रपट तसंच टीव्ही कलाकारांच्या प्रसिद्धीसाठी चिंगारी महत्वपूर्ण घटक म्हणून प्रभावी काम करेल.

या चॅनलच्या माध्यमातून सेलेब्रिटीज अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचू शकतील, त्यांना आपल्या उपक्रमांची माहिती देत राहू शकतील आणि त्यांच्या आगामी चित्रपट व अन्य मनोरंजनविषयक उपक्रमांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करू शकतील. 

अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली, "चिंगारी या देशी अॅपवर मी आपल्या मायबोलीशी अधिक जोडली जाणार आहे. कारण इथे भाषा निवडण्याचा पर्याय आहे. इथे मी माझ्या चाहत्यांना वेगवेगळे चॅलेंजेस देणार आहे, टिप्स देणार आहे, माझ्या प्रोजेक्ट्सची माहिती आणि सेटवरच्या गमतीजमतीची माहितीसुद्धा देणार आहे."

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणाली, "चिंगारी हे खऱ्या अर्थानं भारतीय अॅप आहे. मी चिंगारीवर आली असून माझे फोटो, व्हिडिओ आणि बीहाइंड द सीन्स असे बरेच अपडेट्स इथं असणार आहेत. हेही वाचा

विरोधानंतर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव बदललं

कोरोनामुळं बंद असलेली 'गोरेगाव फिल्मसिटी' अखेर पर्यटकांसाठी खुली

संबंधित विषय
Advertisement