Advertisement

विरोधानंतर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव बदललं

अभिनेता अक्षय कुमार ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे.

विरोधानंतर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव बदललं
SHARES

अभिनेता अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्बचे नाव बदलून 'लक्ष्मी' ठेवलं गेलं आहे. चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित ट्रेलरनंतर लक्ष्मी बॉम्ब ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार ट्रान्सजेंडरची भूमिका साकारत आहे. त्याच्या  भूमिकेची सध्या जोरदार चर्चा आहे.

राघव लॉरेन्स दिग्दर्शित हा चित्रपट सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी गेला होता आणि स्क्रिनिंगनंतर निर्मात्यांनी त्यावर सीबीएफसीशी चर्चा केली. आपल्या प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन आणि त्यांचा आदर ठेवून चित्रपटाच्या निर्मात्यांनी- शबीना खान, तुषार कपूर आणि अक्षय कुमार यांनी आता त्यांच्या चित्रपटाचं शीर्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी अभिनीत हॉरर-कॉमेडी चित्रपटाचं नाव आता 'लक्ष्मी' आहे. तुषार एंटरटेनमेंट हाऊस आणि शबीना एंटरटेनमेंट निर्मित डिस्ने + हॉटस्टार, ए केप ऑफ गुड फिल्म्स प्रस्तुत प्रस्तुत राघव लॉरेन्स दिग्दर्शित ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचा प्रीमियर या दिवाळी ८ नोव्हेंबर २०२० रोजी डिस्ने + हॉटस्टार व्हीआयपीवर होणार आहे.हेही वाचा

महाराष्ट्रात मराठीच 'बिग बॉस', जान कुमार सानूनं मागितली माफी

Bigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement