Advertisement

महाराष्ट्रात मराठीच 'बिग बॉस', जान कुमार सानूनं मागितली माफी

मनसे नेते अमेय खोपकर यांनी (Ameya khopkar) जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. दरम्यान, या प्ररकणी जान कुमार सानूनं मराठी लोकांची माफी मागून यापुढं अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.

महाराष्ट्रात मराठीच 'बिग बॉस', जान कुमार सानूनं मागितली माफी
SHARES

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे बिग बॉस. यंदाच्या १४ व्या पर्वात छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटी या शो सहभागी झाले आहेत. या बिग बॉसमध्ये ३ स्पर्धकांमध्ये म्हणजेच गायक राहुल वैद्य, जान कुमार सानू (Jaan Sanu) आणि निक्की तंबोली यांच्यात आपापसांत जोरदार वाद सुरू होते. या वादादरम्यान जान कुमार सानूनं मराठी गायक राहुल वैद्य याच्यावर शाब्दिक हल्लाबोल करताना 'मराठी' भाषेबद्दल अपमानकारक शब्द उच्चारले. ही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, यावर आता मनसे निशाणा साधला असून, मनसे नेते अमेय खोपकर यांनी (Ameya khopkar) जान कुमार सानूला धमकीवजा इशारा दिला होता. दरम्यान, या प्ररकणी जान कुमार सानूनं मराठी लोकांची माफी मागून यापुढं अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं जान याच्या वक्तव्याबद्दल माफी मागण्यासाठी २४ तास दिले होते. त्यानंतर बिग बॉस या कार्यक्रमात जानला त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली. 'मी नकळत एक चूक केली त्यामुळं मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही', असं जान कुमार सानूनं म्हटलं.

या कार्यक्रमात जान कुमार सानू आणि निक्की तंबोली यांच्या दरम्यान घनिष्ठ मैत्री दाखवण्यात आली होती. काही कारणानं या दोघांमध्ये बिनसल्यानं निक्कीनं जानची साथ सोडत राहुल वैद्यचा हात धरला आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बिगबॉसमधील खेळादरम्यान झालेल्या वादात राहुलशी ती मराठीत संवाद साधण्याच्या प्रयत्न करताना दिसते. याच दरम्यान तिने जानशी देखील मराठीत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जानने तिला, 'माझ्याशी मराठीत बोलायचा प्रयत्न करू नको. बोलायचे असल्यास हिंदीत बोल', असं म्हंटलं. तसंच, 'मला मराठी ऐकून चीड येते', असंही त्यानी म्हटलं.



हेही वाचा -

Bigg Boss 14: मराठी भाषेचा अपमान करेल त्याला भर रस्त्यात थोबडवू- अमेय खोपकर

Bigg Boss 14: मराठीच्या अवमानप्रकरणी कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांना माफिनामा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा