Advertisement

सईचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड!


सईचा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड!
SHARES

'फिल्मफेअर अवॉर्ड' हा बॉलिवूड मधला खूप महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार गेल्या २ वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीतही सुरु करण्यात आलाय. नुकताच तिसरा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात मुंबईत पार पडला. मराठी सिनेसृष्टीतील सर्वच जण या वेळी उपस्थित होते. यावेळी मराठी सिनेमातील हॉट समजल्या जाणाऱ्या 'सई ताम्हणकर'ने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ब्ल्यू गाऊन विथ डायमंड नेकलेस या पेहेरावात ती लक्षवेधक ठरली!



या वेळचा फिल्मफेअर अवॉर्ड हा सईसाठी खास ठरला. कारण, जिओ फिल्मफेअर २०१७ मध्ये सईला दोन चित्रपटांसाठी नामांकनं होती. वजनदार सिनेमासाठी उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून आणि फॅमिली कट्टा या सिनेमासाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून. आणि या वेळचा उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठीचा पुरस्कार सईला प्रदान करण्यात आला आहे.



हा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. "हा  माझा पहिला फिल्मफेअर आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. हा फिल्मफेअर आणखी खास आहे, कारण मला हा अवॉर्ड फॅमिली कट्टासाठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांमुळे खास होता. खूप जवळचा होता आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं आणि ते ही पहिला फिल्मफेअर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे." असं म्हणत तिने तिचा आंनद शेअर केला आहे.



२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या फॅमिली कट्टा या चित्रपटात सईने 'मंजू' नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटातला तिचा वावर अवघा काही मिनिटांचा असला, तरी तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कायम लक्षात राहिल असा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच पाडला होता. आणि या तिच्या भूमिकेसाठी  तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.



हेही वाचा

न्यूड...रवी जाधवचा वेगळ्या धाटणीचा चित्रपट!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा