Advertisement

नागराज बनवणार ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चा 'प्रोमो'!

विविध चित्रपटांतून सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक नागराज आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत. इतकंच नव्हे तर नागराज या प्रोमोमध्ये अभिनय सुद्धा करणार आहेत.

नागराज बनवणार ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग'चा 'प्रोमो'!
SHARES

कुस्ती हा महाराष्ट्राच्या अस्सल मातीतला रांगडा खेळ. झी टॉकीजच्या विद्यमाने महाराष्ट्रातील मातीतल्या या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खास ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चं आयोजन करण्यात आलं आहे. ‘सैराट’ फेम दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचाही या लीगला महत्त्वपूर्ण स्पर्श लाभणार आहे.


२ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन

या कुस्ती लीगचा थरार २ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या कालवधीत पुण्याच्या बालेवाडीत रंगणार आहे. ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नावाजलेल्या कुस्तीगिरांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांशी लढताना बघण्याची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे. या बहुचर्चित ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’ बरोबर सुरवातीपासूनच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज नावं जोडली जात आहेत. त्यातील एक महत्वाचं नाव म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे.


प्रोमो दिग्दर्शित करणार

नागराज हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असून ते केवळ दिग्दर्शक नसून लेखक, कवी आणि अभिनेतेही आहेत. आपल्या प्रत्येक कलाकृतीतून संवेदनशीलतेची जाणीव करून देणारे दिग्दर्शक नागराज महाराष्ट्रातल्या खेळाबाबतही तितकेच सजग आहेत. ‘पिस्तुल्या’, ‘फँड्री’ व ‘सैराट’ या चित्रपटांतून सामाजिक भान जपणारे दिग्दर्शक नागराज आता झी टॉकीजसाठी ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’चा प्रोमो दिग्दर्शित करणार आहेत. इतकंच नव्हे तर नागराज या प्रोमोमध्ये अभिनय सुद्धा करणार आहेत.




प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या

‘सैराट’च्या अफाट यशानंतर नागराजकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी उंचावल्या आहेत आणि नागराजचं नवीन काम पाहण्याची सर्वानांच इच्छा आहे. प्रेक्षकांची ही इच्छा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’मुळे पूर्ण होणार आहे. उत्कंठा हा कुस्ती या खेळाचा श्वास आहे. पैलवानांनी शड्डू ठोकल्यापासून चितपट करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत वाढणारी ही उत्कंठा ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’मुळे आता साऱ्या महाराष्ट्राला लागली आहे. नागराजमुळे ‘झी महाराष्ट्र कुस्ती लीग’चा थरार प्रोमोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत.


प्रोमो आवडेल

या प्रोमोबद्दल नागराज म्हणाले की, घरात बसून छोट्या पडद्यावर क्षणक्षणाला उत्कंठा वाढवणारा कुस्ती हा खेळ पाहण्याची मजा काही औरच असेल. ‘झी महाराष्ट्र कुस्तीलीग’शी संलग्न होऊन त्याचा प्रोमो दिग्दर्शित करताना मला खरंच खूप आनंद होत आहे. माझ्या कामावर आजवर प्रेक्षकांनी भरपूर प्रेम केलं आहे आणि त्यांना हा प्रोमोसुद्धा आवडेल अशी आशा व्यक्त करतो.



हेही वाचा-

महाराष्ट्रात रंगणार कुस्ती चॅम्पियन्स लीग

नागराज, आर्ची-परशाचा 'सैराट' निर्णय, 'मनचिसे'त घेतला प्रवेश




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा