Advertisement

महाराष्ट्रात रंगणार कुस्ती चॅम्पियन्स लीग


महाराष्ट्रात रंगणार कुस्ती चॅम्पियन्स लीग
SHARES

काही महिन्यांपूर्वी झी टाॅकीज वाहिनीने महाराष्ट्र कुस्ती लीगची घोषणा केली होती. पण या स्पर्धेचं पुढे काय झालं, हे कुणालाही कळलं नाही. अाता कलर्स मराठी वाहिनीनेही येत्या अाॅक्टोबर महिन्यात कुस्ती चॅम्पियन्स लीग घेण्याचे ठरवले अाहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद अाणि कलर्स मराठी यांच्या विद्यमाने मॅट अाणि माती या दोन्ही प्रकारात होणारी कुस्ती चॅम्पियन्स लीग ७ ते २८ अाॅक्टोबरदरम्यान पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात रंगणार अाहे. रणयोद्धा मुंबई, कोल्हापूर शाहू, झुंजार पुणे, नरवीर नागपूर, जिगरबाज नाशिक आणि जांबाज औरंगाबाद या सहा संघांमध्ये संध्याकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत कुस्तीचे युद्ध पाहायला मिळणार आहे.


२२ दिवस ९० सामने

कुस्ती चॅम्पियन्स लीगमध्ये सहा संघांचा समावेश असून प्रत्येक संघात ८ पुरुष आणि ४ महिला खेळाडूंचा सहभाग असेल. सहा वजनी गटात ही लीग खेळविण्यात येणार असून प्रत्येक दिवशी ५ बाऊट्स होतील. त्यात पुरुषांचे ४ आणि महिलांचे २ गट असतील. विशेष म्हणजे, महाराष्ट्र केसरीच्या धर्तीवर ही स्पर्धा माती आणि मॅट या दोन्ही प्रकारात खेळविण्यात येणार आहे. तब्बल २२ दिवस रंगणाऱ्या या स्पर्धेत एकूण ९० सामने खेळविण्यात येतील, असे कुस्ती चॅम्पियन्स लीगचे संस्थापक आणि प्रवर्तक पुष्कराज केळकर यांनी सांगितले.


अशी लागणार खेळाडूंवर बोली

अ आणि ब अशा दोन गटांत खेळाडूंवर बोली लावण्यात येणार आहे. दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या अ गटातील खेळाडूंवर बोली लावण्यासाठी ३ लाख रुपये ही बेस प्राइस ठेवण्यात आली आहे तर उदयोन्मुख, हरहुन्नरी मल्लांचा सहभाग असलेल्या ब गटातील खेळाडूंसाठी ५० हजार रुपयांपासून बोली लावण्यात येईल. संघातील १२ खेळाडू निवडण्यासाठी संघमालकांना ३० लाख रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. खेळाडूचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड, विद्यमान कामगिरी आणि भविष्यात कितपत मोठी झेप घेऊ शकेल, यावरूनच खेळाडूंचा अ आणि ब गटात स्थान देण्यात आले आहे. ३०० मल्लांमधून ७२ पैलवान निवडण्यात येतील.


तोपर्यंत फेटा बांधणार नाही

१९५२च्या हेलसिंकी अाॅलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव यांनी भारताला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून दिलं. खाशाबा जाधव यांचा वारसा पुढे महाराष्ट्राच्या मल्लांनी पुढे चालवावा, अशी माझी इच्छा अाहे. जोपर्यंत महाराष्ट्राचा मल्ल कुस्तीत भारताला अाॅलिम्पिक पदक मिळवून देत नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, अशी शपथ घेतली अाहे. २०२० टोकयो अाॅलिम्पिकपर्यंत माझे हे स्वप्न साकार होईल, अशी अाशा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी व्यक्त केली.


हेही वाचा -

ब्रेबाॅर्न स्टेडियममध्ये सौरउर्जा प्रकल्पाची उभारणी

मुंबईकर अभिषेक नायर पुद्दुचेरीकडून खेळणार



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा