नागराज, आर्ची-परशाचा 'सैराट' निर्णय, 'मनचिसे'त घेतला प्रवेश

संपूर्ण देशाला सैराट करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे, आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर एका राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली आले आहेत. हा राजकीय पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

SHARE

झिंग झिंग झिंगाट म्हणत महाराष्ट्रालाच नव्हे; तर संपूर्ण देशाला सैराट करणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे, आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि परशा म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर एका राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली आले आहेत. हा राजकीय पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना. नागराज, रिंकू आणि आकाश यांनी मंगळवारी अधिकृतपणे 'महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेने'चं सभासदत्व स्वीकारल्याची माहिती सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. या तीन दिग्गज कलाकारांच्या येण्याचा चित्रपट सेनेला नक्कीच फायदा होईल, वेगळ्या विचाराने काम करण्यास मदत होईल, असा विश्वासही खोपकर यांनी व्यक्त केला.


हक्कांसाठी काम करणारी संघटना

मनसे चित्रपट कामगार सेना गेली १२ वर्षे चित्रपट क्षेत्रातील कलाकारांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांच्या हक्कासाठी काम करते. त्यांच्या अडीअचडणीच्या वेळेस धावून जात त्यांच्या समस्या सोडवते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं काम आणि त्यांचे विचार कलाकारांना-कर्मचाऱ्यांनाही प्रेरणादायी वाटतात. त्यामुळेच राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेक कलाकार-कर्मचारी मनसे चित्रपट कामगार सेनेत प्रवेश करताहेत. त्यानुसार या तिन्ही कलाकांरांनी मनसे चित्रपट कामगार सेनेचं सभासदत्व स्वीकारल्याचंही खोपकर यांनी सांगितलं.


सदस्य झाल्याचा आनंद

मनसे चित्रपट कामगार सेना खऱ्या अर्थाने कामगार आणि कलाकारांसाठी चांगलं काम करत आहे. कामगार-कलाकारांना मदत करत आहेत. त्यामुळे चित्रपट सेनेत सहभागी व्हावं असं मनापासून वाटल्यानं आपण हे सभासदत्व स्वीकारल्याचं यावेळी नागराजनं सांगितलं. तर रिंकू आणि आकाशनंही चित्रपट सेनेचे सभासद झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.हेही वाचा-

'इकडून तिकडे...’ म्हणत अजयने वेस्टर्न स्टाईलमध्ये गायलं गाणं

‘सविता दामोदर परांजपे’ अमेरिकेतसंबंधित विषय
ताज्या बातम्या