Advertisement

'इकडून तिकडे...’ म्हणत अजयने वेस्टर्न स्टाईलमध्ये गायलं गाणं

मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही अजयने बरीच गाणी गायली आहेत. अजयच्या गायकीचा लहेजा खास पारंपारिक भारतीय संगीताचा आहे, मात्र घर आणि घरातील नात्यांचा गोडवा विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटात त्याने चक्क एक वेस्टर्न बाजाचं गाणं गात आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.

'इकडून तिकडे...’ म्हणत अजयने वेस्टर्न स्टाईलमध्ये गायलं गाणं
SHARES

गायक-संगीतकार अजय गोगावलेने आजवर आपल्या खास शैलीतील गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषांमध्येही अजयने बरीच गाणी गायली आहेत. अजयच्या गायकीचा लहेजा खास पारंपारिक भारतीय संगीताचा आहे, मात्र घर आणि घरातील नात्यांचा गोडवा विषद करणाऱ्या ‘होम स्वीट होम’ या मराठी चित्रपटात त्याने चक्क एक वेस्टर्न बाजाचं गाणं गात आपल्या चाहत्यांना सरप्राईज दिलं आहे.


इकडून तिकडे, तिकडून तिकडे

‘इकडून तिकडे, तिकडून तिकडे...’ असे बोल असलेल्या अजयच्या आवाजातील या गाण्याचं संगीत संतोष मुळेकर यांनी केलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना संगीतकार संतोष मुळेकर म्हणाले, अजय सॉलिड गायक आहेत. त्यांनी आजपर्यंत गायलेली गाणी ही पारंपारिक आणि लोकसंगीताच्या शैलीत मोडणारी आहेत;
परंतु ‘होम स्वीट होम’साठी त्यांनी गायलेलं ‘इकडून तिकडे...’ हे गाणं त्यांच्या शैलीपेक्षा पूर्णपणे निराळं असं वेस्टर्न शैलीत मोडणारं आहे. ते स्वतः संगीतकार असल्यामुळे समोरच्याला नक्की काय हवं हे समजून घेतात आणि गाण्याला अधिक उंचीवर घेऊन जातात. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या सुंदर शब्दांमध्येच गाण्याची चाल दडलेली होती, त्यामुळे ती संगीतबद्ध करणं सोपं झालं.



कधी होणार प्रदर्शित?

अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळत हृषीकेश जोशीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात रीमा, मोहन जोशी, स्पृहा जोशी, हृषीकेश जोशी, विभावरी देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. नात्यांच्या रिडेव्हल्पमेंट वर भाष्य करणारा ‘होम स्वीट होम’ २८ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा - 

'बॉईज २’चं मस्तीदार गाणं लाँच

वेष बदलून पुन्हा पुण्यात शिरला शेरा!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा