Advertisement

वेष बदलून पुन्हा पुण्यात शिरला शेरा!

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'बाजी' या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा नवीन वेष धारण करून पुन्हा पुण्यात शिरला आहे. तो कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला आहे. मराठी साम्राज्याला जहिरीला डंख मारण्याचा त्याचा इरादा आहे.

वेष बदलून पुन्हा पुण्यात शिरला शेरा!
SHARES

पेशवाईच्या कालखंडावर आधारित असलेली छोट्या पडद्यावरील ‘बाजी’ ही मालिका प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. या मालिकेत एका मागून एक येणारे ट्विस्ट पुढे काय घडणार याबाबतची उत्सुकता वाढवत आहेत. आता या मालिकेत आणखी एक ट्विस्ट आला आहे. या मालिकेतील शेरा पुन्हा पुण्यात शिरला आहे.शेराच्या मृत्यूचं रहस्य

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'बाजी' या मालिकेतला बहुरूपी खलनायक शेरा हा नवीन वेष धारण करून पुन्हा पुण्यात शिरला आहे. तो कुबेरासारख्या श्रीमंत हिरे व्यापाऱ्याचं सोंग घेऊन परत आला आहे. मराठी साम्राज्याला जहिरीला डंख मारण्याचा त्याचा इरादा आहे. खलनायक असलेला शेरा हा म्हातारा बनून वेगवेगळी कट-कारस्थानं रचून हैदोस घालण्याच्या इराद्यानं पेशवाईत शिरला होता. पुण्याच्या कोतवालीतला प्रामाणिक शिलेदार बाजी यानं त्याला मारलं.  पण तो खरच मेला  की नाही हे एक रहस्य कायम आहे. त्याचा मृत्यू झाला नसेल, तर नेमकं त्याने काय घडवून आणलं हा ही एक उत्सुकतेचा विषय आहे. 


पेशवाई खिळखिळी करण्यासाठी

ऐतिहासिक घटनांचे संदर्भ घेत लिहिली गेलेली ‘बाजी’ ही एक रहस्य कथा आहे. निजामाच्या कारस्थानाचा भाग म्हणून पेशवाई खिळखिळी करण्यासाठी शेरा पुण्यात आला आहे. तो केव्हा काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही. अभिनेता प्रखर सिंग ही भूमिका साकारत असून, त्याच्या अभिनयशैलीची आणि संवादांचीही प्रशंसा होत आहे. या मालिकेची निर्मिती आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केलं आहे.हेही वाचा -

‘लव्ह सोनिया’च्या प्रेमात बॉलीवूड!

अभिनेत्री दिपाली सय्यदने धरली ‘शिव संग्राम’ची वाट 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा