Advertisement

‘लव्ह सोनिया’च्या प्रेमात बॉलीवूड!

मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या अधोविश्वाचं अत्यंत वास्तवपूर्ण आणि परिणामकारक चित्रण करणाऱ्या ‘लव्ह सोनिया’ या तबरेझ नुरानी दिग्दर्शित सिनेमाचं कौतुक करताना बॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी आपल्या मोठ्या मनाचं दर्शन घडवलं आहे.

‘लव्ह सोनिया’च्या प्रेमात बॉलीवूड!
SHARES

बॅालीवूडमधील कलाकार-तंत्रज्ञांना एखाद्या सिनेमाचा विषय आवडला की, त्याचं कौतुक करायला ते कधीच मागे पुढे पाहत नाहीत. वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून मग त्या सिनेमाचं कौतुक केलं जातं. बॅालीवूडकर सध्या ‘लव्ह सोनिया’ या सिनेमाच्या प्रेमात असल्याचं दिसतं.



वास्तवपूर्ण चित्रण

मानवी तस्करी आणि वेश्याव्यवसायाच्या अधोविश्वाचं अत्यंत वास्तवपूर्ण आणि परिणामकारक चित्रण करणाऱ्या ‘लव्ह सोनिया’ या तबरेझ नुरानी दिग्दर्शित सिनेमाचं कौतुक करताना बॉलीवूडमधील आघाडीचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांनी आपल्या मोठ्या मनाचं दर्शन घडवलं आहे. १७ वर्षांच्या एका मुलीच्या जिद्दीची कहाणी असलेल्या या सिनेमावर बॉलीवूडमधील दिग्गज कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत.


ताकदवान सिनेमा 

बॉलीवूडचा आघाडीचा निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने म्हटलं आहे, “स्वत:च्या बहिणीच्या सुटकेसाठी धैर्याने लढणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीची कहाणी सांगणारा ‘लव्ह सोनिया’ हा सिनेमा मी आजवर पाहिलेल्या सिनेमांमधला सर्वात ताकदवान सिनेमा आहे.”


विचार करायला प्रवृत्त 

एक अत्यंत यशस्वी दिग्दर्शक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजकुमार हिरानी यांनी म्हटलं आहे, “मी ‘लव्ह सोनिया’ पाहिला. सखोल संशोधनावर आधारीत हा सिनेमा पाहून तुम्हाला धक्का बसेल आणि ज्या जगात आपण जगतोय त्याबाबत विचार करायला तुम्हाला प्रवृत्त करेल.”

               

वास्तवाला थेट भिडणारा 

बॉलीवूडच्या या प्रतिसादाविषयी अधिक माहिती देताना ‘लव्ह सोनिया’च्या सहनिर्मात्या आणि सम्राज टॉकीजच्या शालिनी ठाकरे यांनी सांगितलं की, “लव्ह सोनियामध्ये जी ‘दुसरी’ दुनिया दाखवण्यात आली आहे, ती यापूर्वी इतक्या परिणामकारक पद्धतीने कधीच सिनेमातून पुढे आली नव्हती. बॉलीवूडमधील ज्यांनी ज्यांनी हा सिनेमा पाहिला ते अक्षरश: सुन्न झाले, इतका तो वास्तवाला थेट भिडणारा सिनेमा आहे. त्यामुळेच बॉलीवूडमधील नावाजलेले निर्माते-दिग्दर्शक-अभिनेते अगदी मुक्तकंठाने स्तुती करून या एका चांगल्या कलाकृतीला आपला हातभार लावत आहेत.”


ट्वीटरवरून कौतुक

अक्षय कुमार, ऋतिक रोशन, अनिल कपूर, सुनील शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, दिया मिर्झा या अभिनेत्यांनी तसंच निखिल अडवाणी, साजिद खान या निर्माता-दिग्दर्शकांनीही ट्वीटरच्या माध्यमातून ‘लव्ह सोनिया’चं कौतुक केलं आहे.



हेही वाचा -

संथ गतीच्या प्रवाहात हरवलेला ‘बोगदा’

अभिनेता अंशुमन देणार सिनेमाचं प्रशिक्षण!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा