अभिनेता अंशुमन देणार सिनेमाचं प्रशिक्षण!

कलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अंशुमनने सिनेक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन व तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकॅडमी’ची सुरुवात केली आहे.

SHARE

अभिनेता अंशुमन विचारे हे नाव सर्वांनाच ठाऊक आहे. सिनेमा, नाटकांमध्ये काम करताकरता ‘फू बाई फू’सारख्या रिअॅलिटी शोसोबतच इतर मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अंशुमन सिनेसृष्टीत करियर घडवू पाहणाऱ्या तरुणाईला सिनेमाचे धडे देण्यासोबतच १०० टक्के उपलब्ध करून देणार आहे.

कलाक्षेत्रात अभिनेता, निवेदक, गायक, निर्माता म्हणून कार्यरत असलेल्या अंशुमनने सिनेक्षेत्रात करियर करू पाहणाऱ्या नव्या पिढीसाठी योग्य मार्गदर्शन व तंत्रशुद्ध शिक्षण देण्याच्या दृष्टीने ‘अंशुमन विचारे अॅक्टिंग अॅकॅडमी’ची सुरुवात केली आहे. या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकत असताना योग्य व्यक्तींचं मार्गदर्शन करियर घडवतं, हाच महत्वाचा मुद्दा लक्षात घेऊन या अॅकॅडमीची सुरुवात करण्यात आल्याचं अंशुमनने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचीत करताना सांगितलं.


तंत्रशुद्ध शिक्षण देणार

अभिनय काय किंवा या क्षेत्रातील प्रत्येक गोष्टी बारकाईने आत्मसात केल्या गेल्या तरच त्या भविष्यात एखादा चांगला कलाकार किंवा तंत्रज्ञ घडवण्यात उपयोगी ठरतात. हेच व्हिजन ठेवून या अॅकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. आजवरच्या अनुभवातून मी जे शिकलो, ते पुढच्या पिढीला देण्याचा हा प्रयत्न आहे. मला जे अडथळे आले, ते त्यांना येऊ नयेत हाच हेतू ही अॅकॅडमी सुरू करण्यामागे आहे.


१०० टक्के संधी सर्वांनाच पण...

होय, आमची अॅकॅडमी सर्वांना १०० टक्के संधी उपलब्ध करून देईल यात तीळमात्र शंका नाही. प्रत्येकाला योग्यतेनुसार संधी उपलब्ध करून देण्याची हमी आम्ही घेतली आहे. याचा अर्थ त्यांना कामही मिळवून देऊ असा मुळीच नाही. कारण प्रत्येकाला आपापल्या पात्रतेनुसार काम मिळत असतं. तुम्ही किती शिकता आणि ते किती प्रत्यक्षात उतरवता यावर काम मिळणं किंवा न मिळणं अवलंबून असतं. त्यामुळे आम्ही केवळ संधी देऊ.


विविध विभागांमध्ये संधी

चित्रपट अभिनय, चित्रपट दिग्दर्शन, पटकथा लेखन, संगीत दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा आणि सेट डिझाईन यांचं प्रशिक्षण आमच्या अॅकॅडमीमध्ये दिलं जाईल. तंत्रशुद्ध प्रशिक्षण, संवाद कौशल्य, तज्ज्ञांचं मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकास, प्रत्यक्ष अनुभव, ऑडिशनची तयारी या मुलभूत बाबींसाठी मान्यवरांकडून मार्गदर्शन दिलं जाणं हे या अॅकॅडमीचं वैशिष्ट्य आहे.


दिग्गजांचं मार्गदर्शन

पुढच्या पिढीला सिनेमाचं तंत्र शिकवण्याच्या या प्रवासात विद्यार्थ्यांना मराठीतील काही दिग्गजांचंही मार्गदर्शन लाभणार आहे. यात विजय गोखले, किशोरी आंबिये, हेमंत भालेकर, कुशल बद्रिके, किशोर चौघुले आणि दिगंबर नाईक या कलाकारांचा समावेष आहे. भविष्यात गरजेनुसार मराठी सिनेसृष्टीतील आणखी काही मान्यवरांनाही या अॅकॅडमीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.हेही वाचा-

स्टारडमच्या झगमगाटात हरवलेल्या साजिरीची परीकथा

खूशखबर! लेखकालाही मिळणार सिनेमाच्या नफ्यातील १० टक्के वाटासंबंधित विषय
ताज्या बातम्या