Advertisement

चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचा खोटा मेसेज व्हायरल, सलमान संतप्त

व्हायरल होत असलेल्या अफवांवर सलमाननं आपल्या पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

चित्रपटासाठी कास्टिंग करत असल्याचा खोटा मेसेज व्हायरल, सलमान संतप्त
SHARES

सुपरस्टार सलमान खाननं ट्विटरवर एक मेसेज पोस्ट केला आहे. त्यानुसार कुणी तरी त्याचे प्रॉडक्शन हाऊस एसकेएफ (सलमान खान फिल्म्स) बद्दल अफवा पसरवत असल्याचं दिसून येत आहे. सलमाननं आपल्या संदेशासह कॅप्शनमध्ये लिहिलं की, “अफवांवर विश्वास ठेवू नका ... सुरक्षित राहा.”

 

सलमान संतप्त

सलमाननं आपल्या पोस्टमध्ये नाराजी व्यक्त केली आहे. "मी हे स्पष्ट करु इच्छितो की, सध्या मी किंवा सलमान खान फिल्म्स दोघेही चित्रपटाचे कास्टिंग करत नाहीये. आम्ही आमच्या आगामी चित्रपटांसाठी कोणतेही कास्टिंग एजंट घेतलेले नाही. कृपया आपल्याला याविषयी प्राप्त झालेल्या मेसेर आणि ईमेल्सवर विश्वास ठेवू नका. जर एखाद्यानं एसकेएफ किंवा माझे नाव चुकीच्या मार्गानं वापरलेलं आढळलं तर त्याविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल", असं सलमान खानने नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे.

सलमान फार्महाऊसमध्ये अडकला

लॉकडाऊनमुळे सलमान खान जवळपास दोन महिन्यांपासून त्याच्या पनवेलस्थित फार्महाऊसमध्ये अडकला आहे. गरजू लोकांना मदत करणे. गरिबांना रेशन पुरविणे, दैनंदिन मजुरांना पैसे ट्रान्सफर करणे, अशी सर्वतोपरी मदत तो करतोय.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, 'दबंग ३' हा त्याचा अलीकडच्या काळात रिलीज झालेला शेवटचा चित्रपट आहे. सलमान सध्या आपल्या यूट्यूब वाहिनीसाठी सिंगल्स बनवत आहे. त्यांचे 'प्यार कोरोना' आणि 'तेरे बिन' ही दोन गाणी रिलीज झाली आहेत. 'तेरे बिन' हे गाणे सलमान आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यावर चित्रीत झालेलं आहे. वृत्तानुसार, आता तो तिसरं गाणं रिलीज करण्याच्या विचारात आहे, ज्यामध्ये त्याच्यासोबत वलुश्चा डिसूझा झळकू शकते.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा