Advertisement

बिग बॉसच्या मराठीच्या मंचावर येणार सलमान खान

बिग बॉस मराठी सिझन ३च्या चावडीवर सदस्यांना सरप्राईज मिळणार आहे.

बिग बॉसच्या मराठीच्या मंचावर येणार सलमान खान
SHARES

वाढणार बिग बॉस मराठीची शान... जेंव्हा मंचावर येणार 'भाईजान'... सदस्य आणि प्रेक्षक ज्या क्षणाची वाट आतुरतेनं बघत होते तो क्षण आता आला आहे.

बिग बॉस मराठी सिझन ३च्या चावडीवर सदस्यांना सरप्राईज मिळणार आहे. कारण आपल्या सगळ्यांचा लाडका बॉलिवूडचा भाईजान आणि हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक सलमान खान बिग बॉस मराठीच्या मंचावर येणार आहे.

बिग बॉस मराठीच्या सेटवर सलमान खानची धमाकेदार एंट्री होणार आहे. घरातील सदस्य सलमान खानला बघून खुश तर होणारच पण त्यांची इच्छा देखील पूर्ण होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. या आठवड्याची बिग बॉस मराठीची चावडी सलमान खानच्या हजेरीत रंगणार आहे.

नुकताच सलमान स्पेशल एपिसोडचा प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये महेश मांजरेकर म्हणतात, “आपल्या चावडीवर येणार आहे एक खास पाहुणा”. त्याचसोबत सलमान खानने देखील म्हणतोय, “मी येतोय बिग बॉस मराठीच्या चावडीवर.”

'अंतिम'चे प्रमोशन करण्यासाठी सलमान खान आणि आयुष शर्मा मराठी बिग बॉस शोमध्ये येणार आहेत. ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

यामध्ये सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. तर आयुष गँगस्टरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 

‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ हा चित्रपट मराठीतील गाजलेल्या ‘मुळशी पॅटर्न’चा हिंदी रिमेक आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आपल्या याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सलमान ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर येतोय.हेही वाचा

प्रियंका चोप्राची आई संतापली, घटस्फोटाच्या वृत्तावर म्हणाली...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा