Advertisement

संदिप पाटीलांच्या भूमिकेत मुलगा चिराग

संदीप पाटील यांच्यासाठीही अभिनय ही नवीन गोष्ट नाही. १९८३ च्या विश्वचषक विजयानंतर त्यांनी विजय सिंह यांच्या 'कभी अजनबी थे' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती.

संदिप पाटीलांच्या भूमिकेत मुलगा चिराग
SHARES

क्रिकेट आणि मनोरंजन विश्वाचं नातं खूप जुनं आहे. अगदी सिनेसृष्टीच्या उगमापासून... त्यामुळेच रुपेरी पडदाही क्रिकेटपासून कधी दूर राहिला नाही. आता '८३' हा सिनेमा भारतीय क्रिकेट संघाने पटकावलेल्या विश्वचषकाच्या आठवणींना उजाळा देणार आहे. या सिनेमात संदिप पाटील यांची भूमिका त्यांचा मुलगा चिराग साकारत आहे.


इतिहासाची पुनरावृत्ती

१९८३ च्या विश्वचषक स्पर्धेत संदिप पाटील यांनी मधल्या फळीतील फलंदाजाच्या रूपात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत भारतीय क्रिकेट संघाच्या यशात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. पहिल्या विश्वचषक विजयानंतर ३६ वर्षांनी लॅार्डसच्या मैदानावरील सुवर्ण इतिहास रुपेरी पडद्यावर अवतरणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात मोठमोठे कलाकार झळकणार असल्याच्या बातम्या येत आहेत. या सिनेमात आपल्या वडिलांची भूमिका साकारताना चिराग जणू इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.


स्वप्न साकार 

चिरागला जरी क्रिकेटची आवड असली तरी सुरुवातीपासून अभिनयाकडेच त्याची ओढ होती. त्यामुळेच अभिनयात करियर घडवत त्याने काही मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये अभिनयही केला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर का होईना भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीमध्ये क्रिकेट खेळण्याचं चिरागचं स्वप्न साकार होणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह साकारत असलेल्या कपिल देवच्या नेतृत्वाखालील संघातून मैदानावर उतरण्यासाठी चिराग खूप उत्सुक आहे.


वडिलांची स्टाईल

संदीप पाटील यांच्यासाठीही अभिनय ही नवीन गोष्ट नाही. १९८३ च्या विश्वचषक विजयानंतर त्यांनी विजय सिंह यांच्या 'कभी अजनबी थे' या सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या जोडीला पूनम धिल्लों आणि देबाश्री रॅाय या अभिनेत्री होत्या. भारतीय क्रिकेट इतिहासातील सोनेरी क्षणांची आठवण करून देणाऱ्या  '८३' या चित्रपटात वडिलांची भूमिका साकारायला मिळाल्यानं चिराग खूप उत्साहित आहे. चिरागने कधीच प्रोफेशन क्रिकेट खेळलेलं नाही, पण या सिनेमाच्या निमित्ताने त्याला आपल्या वडिलांची स्टाईल शिकण्याची संधी मिळाली आहे.



हेही वाचा -

छोट्या पडद्यावरील ‘कमांडर’ हरपला, अभिनेते रमेश भाटकर यांचं निधन




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा