संगीत मेजवानीचा शनिवार

 Mumbai
संगीत मेजवानीचा शनिवार
Mumbai  -  

वरळी - वेगवेगळ्या प्रहरात गायले जाणारे वेगवेगळे राग नामवंत गायकांच्या सुरात ऐकण्याची संधी शनिवारी संगीत प्रेमींना मिळणार आहे. तब्बल 5 तासांची ही संगीत मेजवानी असणार आहे. नेहरू सेंटर मध्ये होणाऱ्या बनयान ट्री या कार्यक्रमाअंतर्गत शनिवारी सायंकाळी 5 ते रात्री 10.30 या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे.

या वेळी पंडित राहुल शर्मा , पंडित राहुल देशपांडे, उस्ताद शुजात खान, हर्ष नारायणन , पंडित भवानीशंकर , देवू खान, कचरा खान आदी कलाकार आपली कला सादर करणार आहेत. या कार्यक्रमाची तिकिटे 1 तास आधी नेहरू सेंटर मध्ये उपलब्ध असणार आहेत.

Loading Comments