Advertisement

अमृता-मनोजची केमिस्ट्री


अमृता-मनोजची केमिस्ट्री
SHARES

‘राझी’ सिनेमातील बहुचर्चित मुनिराच्या भूमिकेनंतर मराठमोळी अमृता खानविलकर आता ‘सत्यमेव जयते’ या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात मनोज आणि अमृताची केमिस्ट्री अनुभवयला मिळेल.

‘राझी’तील मुनिरानंतर आता ‘सत्यमेव जयते’मध्ये अमृताने साकारलेल्या सरिताची चर्चा सर्वत्र सुरू आहे. मिलाप झवेरी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये मनोजने पोलिसाची व्यक्तिरेखा साकारली असून अमृता त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. सरिताही अगदी वास्तवातील अमृतासारखी आहे.


अमृता झाली गुंग

या सिनेमाच्या निमित्ताने मनोज-अमृताची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. मनोज जरी शिस्तप्रिय आणि रागीट दिसत असले तरी ते स्वभावाने खूप शांत आणि खोडकर स्वभावाचे असल्याचं अमृताचं म्हणणं आहे. या सिनेमातील मनोजसोबतच्या एका दृश्यात अमृता इतकी गुंग झाली की, ‘अगं लाईन घे...’ असं सांगून तिला भानावर आणावं लागलं.


ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही छान

सेटवरही दोघांची खूप धमाल सुरू असायची. मनोजला अमृता इतके प्रश्न विचारायची की, अमृता इंटरव्ह्यू घेते असं मनोज म्हणायचा. यावरून दोघांचीही ऑफस्क्रीन केमिस्ट्रीही छान जुळल्याचा अंदाज येतो. याशिवाय या सिनेमात अमृताला जॉनसोबतही काम करण्याची संधी मिळाली. १५ ऑगस्टला प्रेक्षकांना अमृता-मनोजची केमिस्ट्री पाहायला मिळेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा