'सीबीएफसी हटवा'

  Pali Hill
  'सीबीएफसी हटवा'
  मुंबई  -  

  मुंबई - हिंदी सिनेमांना प्रमाणपत्र देण्यासह सेन्सॉरचे काम करणारे सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) हटवण्यात यावे, अशी मागणी दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी सरकारकडे केलीय. मुंबई फिल्म फेस्टिव्हलच्या 'ऑन द सेट अ टॉक विद डायरेक्टर्स' या चर्चासत्रात ते बोलत होते. कलाकृतीमधील सीन्सवर कात्री मारण्याचा हक्क त्यांच्याकडून काढून घ्यावा असं आजवर म्हटलं जात होतं, पण आता विशाल यांनी थेट सीबीएफसीच बरखास्त करा अशी टीका केलीय. या चर्चासत्रात रोहित शेट्टी, शबूजीत सरकार, झोया अख्तर, गौरी शिंदे, असे अनेक दिग्दर्शक होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.