Advertisement

शाहरुखनं दान केले ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन्स

शाहरुखने कोरोना रुग्णांसाठी ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन्स दान केले आहेत.

शाहरुखनं दान केले ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन्स
SHARES

कोरोना काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकार मदतीसाठी पुढे आले आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरुखदेखील यात मागे नाही. शाहरुखने दिल्लीतील कोरोना रुग्णांसाठी ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन्स दान केले आहेत.

शाहरूखनं दिल्लीला ५०० रेमडेसीवीर इन्जेक्शन डोनेट केले. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं की, “शाहरुख खान आणि मीर फाउंडेशनचे आम्ही मनापासून आभार मानतो. दिल्लीला सर्वात जास्त गरज असताना त्यांनी या कठीण काळात ५०० रेमडेसीवीर इंजेक्शन्स दान केले. या गरजेच्या वेळी केलेल्या मदतीबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत.”

शाहरुखच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं आपल्या बहुप्रतिक्षित पठान या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केली आहे. यात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम झळकणार आहेत. याशिवाय तो राजकुमार हिरानींच्या 'इमिग्रेशन टेल' आणि दाक्षिणात्य दिग्दर्शक एटली यांच्या 'फ्लिक' या अॅक्शन पटात काम करणार आहे.



हेही वाचा

मनोरंजन क्षेत्राला मिळणार उद्योगाचा दर्जा

कोरिओग्राफर रेमो डिसूझाला हृदयविकाराचा झटका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा