'हॅरी मेट सेजल' अॅट थुकरटवाडी

Mumbai
'हॅरी मेट सेजल' अॅट थुकरटवाडी
'हॅरी मेट सेजल' अॅट थुकरटवाडी
'हॅरी मेट सेजल' अॅट थुकरटवाडी
'हॅरी मेट सेजल' अॅट थुकरटवाडी
'हॅरी मेट सेजल' अॅट थुकरटवाडी
See all
मुंबई  -  

कुंजवनाची सुंदर राणी, माळाच्या माळामंदी, तुझ्या रुपाचं पाखरू आणि गोविंदा रे गोपाळा या गाण्यावर हिंदी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार शाहरुख खान नृत्य करतोय. त्याला साथ लाभलीय चुलबुली अनुष्का शर्माची. दचकू नका. हे खरं आहे. जेव्हा हॅरी म्हणजे शाहरुख खान सेजल म्हणजे अनुष्का शर्माला भेटतो, तोही थुकरटवाडीत, तेव्हा अशी धटिंग तो बनती है... शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा आपल्या आगामी 'जब हॅरी मेट सेजल' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी मराठीच्या  'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आले. शाहरुखची या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची दुसरी तर अनुष्काची ही पहिलीच वेळ. शाहरुख या कार्यक्रमात फक्त नाचलाच नाही तर, त्याला स्वतःसोबत  नटसम्राट चित्रपटातील स्वगत म्हणण्यासाठी लेखक, निवेदक डॉ. निलेश साबळेने भाग पाडलं. अनुष्कानेही  'ती फुलराणी'तलं प्रसिद्ध तुला शिकवीन चांगलाच धडा, सादर करत उपस्थितांची दाद मिळवली. अंगावर साडी आणि डोक्यात गजरा अशा मराठमोळ्या ढंगात अनुष्का या कार्यक्रमासाठी आली होती, हे विशेष. एकंदरीत धम्माल मजा मस्तीने सजलेले ‘चला हवा येऊ द्या’चे दोन्ही भाग प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करणार आहेत. येत्या सोमवार आणि मंगळवारी म्हणजेच ३१ जुलै आणि १ ऑगस्ट ला रात्री ९.३० वाजता झी मराठीवरुन प्रेक्षक हॅरी आणि सेजलचा धिंगाणा पाहू शकतील.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.