Advertisement

आपाचे इंडियन-रफ्तारच्या ‘पंजाबी गर्ल’ला मराठमोळा ’स्पर्श’

‘७०२ दिक्षीत’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आपाचे इंडियन आणि रफ्तारसोबतच्या अल्बमला मराठमोळा स्पर्श दिल्याने शंख पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आला आहे.

आपाचे इंडियन-रफ्तारच्या ‘पंजाबी गर्ल’ला मराठमोळा ’स्पर्श’
SHARES

काही मराठी तरुण-तरुणी आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करत असतात, पण त्यांची नावं फार कमी वेळा किंवा एखादा पुरस्कार मिळाल्यावरच प्रकाशझोतात येतात. अशाच तरुणांपैकी एक आहे दिग्दर्शक शंख राजाध्यक्ष. ‘७०२ दिक्षीत’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनानंतर आपाचे इंडियन आणि रफ्तारसोबतच्या अल्बमला मराठमोळा स्पर्श दिल्याने शंख पुन्हा एकदा लाइमलाईटमध्ये आला आहे.




‘पंजाबी गर्ल’ म्युझिक अल्बम

नव्वदच्या दशकात गाजलेल्या काही नावांपैकी एक म्हणजे ब्रिटिश गायक-गीतकार आपाचे इंडियन. मूळ स्टीव्हन कपूर नाव असलेला हा गायक आपाचे इंडियन म्हणूनच जगभरात ओळखला जातो. मागील काही वर्षांपासून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेल्या गायक रॅपर रफ्तारसोबत आपाचे इंडियनने एक म्युझिक अल्बम बनवला आहे. ‘पंजाबी गर्ल’ नावाचा हा अल्बम नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. जागतिक स्तरावरील या अल्बमसाठी शंखने काम केलं आहे.




यशस्वी संकलन

शंख जरी दिग्दर्शक असला तरी दिग्दर्शनासोबतच फिल्म मेकिंगच्या सर्वच विभागात काम करण्याची कला अंगी त्याच्या अंगी आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्याच्या ध्यासाने पछाडलेल्या शंखने ‘पंजाबी गर्ल’चं यशस्वी संकलन केलं आहे. अशा प्रकारच्या अल्बमसाठी खूप शूट केलं जातं. त्यातून रसिकांना जे हवं आणि गाण्याला तसंच गायकाच्या शैलीला सूट होईल ते अचूकपणे वेचून तितकंच सादर करण्याचं कौशल्य शंखने या अल्बममध्ये दाखवलं आहे.


सोशल मीडियावर हिट

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या अल्बमच्या निमित्ताने ख्यातनाम गायकांसोबत काम करण्याचा अनुभव शंखने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना शेअर केला. या अल्बमबाबत शंख म्हणाला की, आपाचे इंडियन आणि रफ्तार यांचा ‘पंजाबी गर्ल’ हा अल्बम नुकताच ग्लोबली रिलीज करण्यात आला आहे. यूकेमधील ‘ब्रिट एशिया’ नावाच्या चॅनलवर या गाण्याचा प्रीमियर करण्यात आला आहे. त्यानंतर युट्यूबच्या माध्यमातून हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियासोबतच इतरही प्लॅटफॅार्म्सवर गाजत आहे.




खास अनुभव देणारा

‘माय वाईफ्स मर्डर’ तसंच ‘शिखर’सारख्या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचं संकलन करणाऱ्या एडिटर अजॅाय वर्मा यांना आपला मेंटॅार मानणाऱ्या शंखच्या म्हणण्यानुसार हा अल्बम त्याच्यासाठी एक खास अनुभव देणारा ठरला. तो म्हणाला की, मला नेहमीच आव्हानात्मक काम करायला आवडतं. या अल्बमसाठी काम करताना आंतरराष्ट्रीय दर्जाचं काम कशा प्रकारे केलं जातं याचा अनुभव आला. काॅन्सेप्टपासून मी यात इन्व्हॅाल्व्ह होतो. आपाचे इंडियन आणि रफ्तार यांच्या जोडीला मरियाना नावाची एक स्टारही यात आहे.


काम करण्याची संधी

दोन गाजलेल्या गायकांसोबत काम करण्याची संधी मिळण्याबाबत शंख म्हणाला की, डीओपी दुलिप रेग्मी माझा खूप चांगला मित्र आहे. त्याच्यामुळेच मला या अल्बमसाठी काम करण्याची संधी मिळाली. खरं तर दुलिपसोबत मी माझ्या पहिल्या चित्रपटाचं चित्रीकरण करणार होतो, पण काही खासगी कारणांमुळे त्याला जमलं नाही. नेहमी माझं चित्रीकरणाचं काहीही काम असेल तर तोच डीओपी असतो. त्याच्याकडे हा अल्बम शूट करण्याचं काम आलं, तेव्हा त्याने मला काम करशील का? असं विचारलं. अर्थातच, नकार द्यायला वावच नव्हता.




पंजाबी गर्ल कोण?

अँजेला क्रिसलिन्झ्की या अल्बममध्ये पंजाबी गर्ल बनली आहे. डीओपी दुलिपनेच या अल्बमचं दिग्दर्शनही केलं असून, या अल्बमचे कोरिओग्राफर रजीत देव यांच्यासोबत त्याने क्रिएटिव्ह दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. चार्ली हाइप यांनी या अल्बमचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. वंदना गुप्ता आणि सनसेट एंटरटेन्मेंट ग्रुप ‘पंजाबी गर्ल’चे एक्झिक्युटीव्ह प्रोड्युसर्स असून, आनंदनव म्युझिक पब्लिशिंग हे पब्लिशर आहेत.



हेही वाचा-

#Metoo: नाना पाटेकरनंतर कैलाश खेर, विकास बहल यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप

अखेरपर्यंत अंतर्बाह्य खिळवून ठेवणारी अफलातून ‘धून’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा