Advertisement

चित्रपट, मालिकांपेक्षा सिद्धार्थ शुक्ला 'या' वादविवादांमुळे राहिला चर्चेत

सिद्धार्थ नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असे. नजर टाकूया त्याच्या आत्तापर्यंतच्या वादविवादांवर...

चित्रपट, मालिकांपेक्षा सिद्धार्थ शुक्ला 'या' वादविवादांमुळे राहिला चर्चेत
SHARES

बिग बॉस विजेता, सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि शहनाजसोबतच्या नात्यापेक्षा सिद्धार्थ शुक्ला त्याच्या वादांमुळे जास्त चर्चेत राहिला. सिद्धार्थ नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात अडकत असे. नजर टाकूया त्याच्या आत्तापर्यंतच्या वादविवादांवर...

  • बिग बॉसच्या घरात सिद्धार्थनं माहिरा शर्माला टास्क दरम्यान दुखापत केली होती. यामुळे निर्मात्यांनी सिद्धार्थला घराबाहेर केलं होतं. पण त्याला मिळालेली पसंती पाहून पुन्हा शोमध्ये आणलं. अखेर तोच शोचा विजेता ठरला.
  • तो आणि शिल्पा शिंदे रिलेशनशिपमध्ये होते अशी चर्चा आहे. शिल्पा शिंदेनं रिलेशनशिपदरम्यान मारहाणीचा आरोप केल्याचं देखील बोललं जातं.
  • असं वृत्त होतं की, 'दिल से दिल तक' च्या दरम्यान सिद्धार्थ सहकलाकारांसोबत अनेकदा भांडायचा.
  • रश्मी आणि सिद्धार्थ यांनी कलर्स वाहिनीच्या 'दिल से दिल तक' या शोमध्ये काम केलं आहे. या मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये खूप भांडणं झाली होती. या दोघांनी एकमेकांना डेट केल्याचा दावाही अनेक अहवालांमध्ये करण्यात आला होता.
  • 'दिल से दिल तक' या शोमध्ये सिद्धार्थचा सहकलाकार कुणाल वर्मा यानंही त्याच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. खरेतर, या मालिकेच्या सेटवर कुणाल आणि सिद्धार्थ यांच्यात खूप भांडणं झाली होती आणि सिद्धार्थनं त्याच्यावर पाणीही फेकलं होतं.
  • सिद्धार्थचं 'बालिका वधू' सह-कलाकार तोरल रसपुत्राशी चांगले संबंध नव्हते. हनीमून सीक्वेन्सच्या शूटिंग दरम्यान दोघांमध्ये खूप भांडणं झाली होती. त्यानंतर दोघे कधीच बोलले नाहीत.
  • २०१४ मध्ये, नवीन वर्षाच्या पार्टीतून परतताना, सिद्धार्थवर ड्रंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यासाठी त्याला २००० रुपये दंड भरावा लागला होता.
  • तो अनेकदा त्याच्या अफेअरमुळे चर्चेत राहिला. सिद्धार्थ जेव्हा बिग बॉसमध्ये गेला तेव्हा त्याचे नाव तनिषा मुखर्जी, रश्मी देसाई, आकांक्षा पुरी, शेफाली जरीवाला आणि स्मिता बन्सल यांच्याशी जोडले गेले होते.
  • बालिका वधूमध्ये काम करणाऱ्या शीतल खंडालने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. शीतलच्या मते, सिद्धार्थ तिच्यावर डबल मीनिंग आणि वल्गर जोक्स करत असे. त्यानंतर सिद्धार्थनं दुसऱ्या दिवशी सेटवर खूप गोंधळ घातला होता.
  • सिद्धार्थ खूप वेगाने गाडी चालवण्यामुळेही बदनाम होता. आणि २०१८ मध्ये रश ड्रायव्हिंगच्या प्रकरणात अटकही झाली. २२ जुलै २०१८ रोजी सिद्धार्थ आपली कार अतिशय वेगाने चालवत होता. नंतर सिद्धार्थनं आपले नियंत्रण गमावले आणि त्याची कार तीन कारला धडकली. पोलिसांनी सिद्धार्थविरुद्ध कलम 279, 367 आणि 427 नुसार गुन्हा दाखल केला होता. ५००० रुपये दंड भरल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली होती.



हेही वाचा

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचं कळताच 'अशी' झाली शहनाज गिलची अवस्था

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर पोलिसांचं 'हे' वक्तव्य, शवविच्छेदनानंतर....

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा