Advertisement

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचं कळताच 'अशी' झाली शहनाज गिलची अवस्था

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची बातमी त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिलला देखील कळाली.

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचं कळताच 'अशी' झाली शहनाज गिलची अवस्था
SHARES

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनाच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. सिद्धार्थ शुक्लाला तातडीनं कूपर रुग्णालयात नेण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी सांगितलं की रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी ४० वर्षीय अभिनेत्याचा मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थला हृदयविकाराचा झटका आला.

सिद्धार्थच्या मृत्यूवर अनेक सेलिब्रिटिंनी हळहळ व्यक्त केली. त्याच्या निधनाची बातमी त्याची कथित गर्लफ्रेंड शहनाज गिलला (Shehnaaz Gill) देखील कळाली. त्यावेळी ती शूटिंगमध्ये व्यस्त होती. सिद्धार्थच्या मृत्यूची बातमी मिळताच शहनाज गिलनं तिचं शूटिंग थांबवलं.

सिद्धार्थच्या मृत्यूच्या बातमीनं प्रत्येकजण हैराण झाला आहे. स्टार्सपासून ते चाहत्यांपर्यंत सोशल मीडियावर दुःख व्यक्त केलं जात आहे. दिवंगत अभिनेत्याच्या आत्म्याला शांती लाभो अशी प्रार्थना केली जात आहे. दरम्यान, अशी माहिती समोर आली आहे की ही बातमी शहनाज गिलपर्यंतही पोहोचली आहे आणि ही बातमी मिळताच तिनं लगेच शूटिंग थांबवलं.

विशेष म्हणजे सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) आणि शहनाज गिल (Shehnaaz Gill) यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. शहनाज गिल आणि सिद्धार्थची मैत्री बिग बॉस १३च्या दरम्यान सुरू झाली. त्याच वेळी, शोनंतरही दोघंही शेवटपर्यंत चांगले मित्र राहिले.

चाहत्यांचा विश्वास होता की, दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. परंतु सेलिब्रिटि नेहमीच एकमेकांना चांगले मित्र म्हणतात. काही दिवसांपूर्वीच शहनाज गिल आणि सिद्धार्थ 'बिग बॉस ओटीटी' आणि 'डान्स दिवाने ३' मध्ये दिसले होते. त्यावेळी त्यांच्यात चांगली केमिस्ट्री पाहायला मिळाली.

बिग बॉसशिवाय दोघांनी एकत्र म्युझिक अल्बममध्ये देखील काम केलं आहे. शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांचं 'शोना शोना' हे गाणं खूप व्हायरल झालं. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच पसंत केलं गेलं.

'शोना शोना' हे गाणे टोनी कक्कर आणि त्याची बहीण नेहा कक्कर यांनी गायलं होतं. त्याचबरोबर या गाण्यावर शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली. लोकांना नेहमीप्रमाणे दोघांची जोडी खूप आवडली. दोघांच्या जोडीमुळे हे गाणं सुपरहिट झालं.

आता सिद्धार्थच्या मृत्यूनंतर सिदनाज (SidNaaz) ही जोडी तुटली असल्यानं चांहते निराश आहेत. शहनाज गिल सुद्धा अद्याप धक्क्यातून सावरली नाही. त्यामुळे तिच्याकडून अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.हेही वाचा

सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट व्हायरल, 'धन्यवाद' म्हणत...

सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर पोलिसांचं 'हे' वक्तव्य, शवविच्छेदनानंतर....

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा