Advertisement

विठ्ठल रखुमाईला भेटण्यासाठी "आसावला जीव", अनिरुद्ध जोशीचा नवा व्हिडिओ

सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजानं सजलेला "आसावला जीव" हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ घेऊन आले आहेत.

विठ्ठल रखुमाईला भेटण्यासाठी "आसावला जीव", अनिरुद्ध जोशीचा नवा व्हिडिओ
SHARES

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षी वारी होणार नाही. त्यामुळे वारकरी आणि पंढरीच्या विठ्ठलाची आषाढी एकादशीला गाठभेट होऊ शकणार नाही. म्हणूनच सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजानं सजलेला "आसावला जीव" हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ घेऊन आले आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त सागरिका म्युझिक आपल्यासाठी हे गाणं घेऊन आलं आहे. हे गाणं अनिरुद्ध जोशीवरच चित्रित करण्यात आलं आहे. गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन अनिरुद्ध-अक्षय यांचं आहे. संगीत संयोजन अमित पाध्ये यांनी केलं आहे. तर हॅण्डलॉक इव्हेंट अँड फिल्म्सनं या व्हिडीओचे चित्रीकरण केलं आहे.

शेकडो किलोमीटर चालत जाऊन पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठल रखुमाईला डोळे भरून पाहणं, चंद्रभागेत स्नान करणं ही कित्येक शतकांची आपली परंपरा आहे. मात्र करोना विषाणूनं या परंपरेत खंड पाडला आहे.

काही वाऱ्या, पालख्या पंढरीत जाणार असल्या तरी वारकऱ्यांना घरी राहूनच विठूनामाचा गजर करावा लागणार आहे. सलग दुसऱ्या वर्षीही आषाढी एकादशी विठ्ठलाच्या प्रत्यक्ष दर्शनाविना जाणार असल्यानं वारकरी आसावले आहेत. हीच भावना या म्युझिक व्हिडिओतून मांडण्यात आली आहे.


 हेही वाचा

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा सांगणा-या ‘शेरशाह’चा टीझर रिलीज

प्रदर्शनापूर्वीच फिरस्त्यावर पुरस्कारांचा वर्षाव

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा