Advertisement

सावनी रविंद्रच्या चाहत्यांचं अनोखं ‘गेट-टू-गेदर’


सावनी रविंद्रच्या चाहत्यांचं अनोखं ‘गेट-टू-गेदर’
SHARES
Advertisement

कोणत्याही सेलिब्रिटीच्या आयुष्यात चाहत्यांचं खूप महत्त्व असतं. फॅनफॉलोईंग स्टार्सना प्रसिद्धीच्या शिखरावर नेतं आणि तिथे टिकून राहायला मदत करतं. गोड गळ्याची गायिका सावनी रविंद्रचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर विदेशातही खूप फॅन्स आहेत. या चाहत्यांनी नुकतीच सावनीची भेट घेत एक छोटेखानी गेट-टू-गेदर केलं.


चाहत्यांशी मारल्या गप्पा

एका कॉन्टेस्टच्या माध्यमातून सावनीच्या काही लकी चाहत्यांना तिला भेटायची संधी मिळाली. याप्रसंगी सावनी आणि तिच्या चाहत्यांसाठी एक छोटेखानी गेट-टू-गेदर आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सावनीने आपल्या चाहत्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या, तर चाहत्यांनी आपल्या आवडत्या गायिकेला विविध प्रश्न विचारत संवाद साधला. सावनीला भेटण्यासाठी तिचे चाहते विविध ठिकाणांहून आले होते. चाहत्यांना भेटण्याचा आनंद सुखावणारा असल्याची भावना सावनीने व्यक्त केली.


लातूर, सोलापूरहून आले चाहते

या मिट-एन्ड-ग्रिट संदर्भात सावनी म्हणाली, या समारंभासाठी पुणे-मुंबईत नाही, तर लातूर, सोलापूरहून अनेक चाहते आले होते. माझ्यावर त्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आता आणखी जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली आहे. अधिकाधिक उतमोत्तम काम करण्याकडे आपण लक्ष द्यायला हवं, हे जाणवलं आहे. तसंच या मिट-एन्ड-ग्रीटला मिळालेल्या प्रतिसादावरून वर्षातून एकदातरी अशी मिट-एन्ड-ग्रीट चाहत्यांसाठी ठेवायचा निर्णय घेतला आहे.

संबंधित विषय
Advertisement