Advertisement

बिग बॉस मराठी ३ मधून स्नेहा वाघ बाहेर

‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बिग बॉस मराठी ३ मधून स्नेहा वाघ बाहेर
SHARES

‘कलर्स मराठी’वरील या धमाकेदार रिअॅलिटी शोने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कार्यक्रमाचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, रविवारी झालेल्या भागात स्नेहा वाघ घराच्या बाहेर पडल्याची माहिती आहे.

गेल्या आठवड्यात टास्कदरम्यान प्रेक्षकांना घरातील सदस्यांचा जोरदार राडा पाहायला मिळाला. विकास आणि जय यांच्यात झालेली बाचाबाची असेल किंवा मीनल आणि जय यांचं भांडण असेल, प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या सदस्याला पाठिंबा दर्शवला.

सोनाली आणि मीरामध्ये झालेल्या भांडणात सोनाली मीराला कोल्हापूरचं पाणी पाजताना दिसली. त्यावरून सोनालीचं प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केलं.

तर मीनल, विकास आणि विशाल यांच्या युक्तीमुळे टीम बीचे अर्धे सदस्य घराबाहेर होण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले. सोनाली, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, दादूस आणि मीरा हे सदस्य यावेळेस घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी पात्र आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनालीला सगळ्यात जास्त मत मिळाल्यानं ती सेफ झाली. तर उत्कर्ष आणि मीरा यांना देखील चांगली मतं मिळाल्यानं ते दोघेही सेफ झाले. मात्र स्नेहा, गायत्री आणि दादूस यांची मतं कमी जास्त होत होती. पण गायत्री सेफ झाली.

त्यानंतर स्नेहा आणि दादूस यांच्या मतांमध्ये फार कमी मतांचा फरक होता. त्यामुळे स्नेहा किंवा दादूस यांमधील एक यावेळेस घराबाहेर जाण्याची शक्यता होती. पण दादूस सेफ झाले आणि स्नेहा बाहेर पडल्यानं सगळ्यांनाच धक्का बसला.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा