अक्षय, सोनाक्षी आणि सिद्धार्थचा 'इत्तेफाक'!


SHARE

सोनाक्षी सिन्हा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांचा आगामी चित्रपट 'इत्तेफाक'चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोघांनी चित्रपटाचा ट्रेलर ट्वीटरवर शेअर केला आहे. दोन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये सोनाक्षी आणि सिद्धार्थचा वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. तर त्यासोबतच अक्षय खन्नाचा दमदार परफॉर्मन्सही पाहायला मिळत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे.सोनाक्षीनं ट्रेलर ट्वीट करत त्याला कॅप्शन दिले आहे की, 'मी माझ्या पतीचा खून नाही केला आणि हे मी खरं बोलत आहे.' 'इत्तेफाक' एक थ्रिलर चित्रपट आहे. दुहेरी हत्याकांड या घटनेच्या भोवती चित्रपटाची कथा फिरत असते. सोनाक्षी सिन्हाने चित्रपटात एका विवाहित स्त्रीची व्यक्तीरेखा साकारली आहे. सोनाक्षीचा पती शेखर सिन्हाचा खून होतो. याचा आरोप विक्रम सेठी म्हणजेच सिद्धार्थवर येतो. फक्त सोनाक्षीच्या पतीचाच नाही, तर स्वत:ची बायको कॅथरिन सेठीच्या खुनाचा आरोप देखील विक्रम(सिद्धार्थ)वर येतो. विक्रमसोबत पोलिसांच्या संशयाच्या कचाट्यात सोनाक्षी सिन्हा देखील सापडते. त्यामुळे आरोपीच्या पिंजऱ्यात सोनाक्षी आणि सिद्धार्थ हे दोघे असतात. अक्षय खन्नानं या चित्रपटात पोलिसाची भूमिका साकारली आहे. दोघांचा खून का होतो? सोनाक्षी की सिद्धार्थ, या दोघांपैकी कोण खून करतं? याचा तपास अक्षय खन्ना करतो.

चित्रपटात सोनाक्षी आणि सिद्धार्थ या दोघांनी चांगला अभिनय केला आहे. अक्षय खन्नाच्या अभिनयासंदर्भात काही वेगळं सांगायची गरजच नाही. धर्मा प्रॉडक्शन आणि रेड चिलीज एंटरटेन्मेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट बनवण्यात आला आहे. यश चोप्रा दिग्दर्शित 'इत्तेफाक' चित्रपटाचा हा रिमेक आहे. ७൦ च्या दशकातील या सिनेमात राजेश खन्ना आणि नंदा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या सिनेमाचे निर्माते शाहरुख खान आणि करण जोहर आहेत. ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.हेही वाचा

कल्की कोचलीनच्या 'रिबन'चा ट्रेलर लाँच

प्रभास आणि अनुष्कामध्ये चाललंय काय?


संबंधित विषय