Advertisement

बॉलिवूडमधील 'हे' ५ कलाकार आहेत २०२० वर्षातील रियल लाईफ हिरो

विचित्र परिस्थितीत काही 'रील लाइफ' हीरो २०२० या सालातील 'रिअल-लाइफ' नायक बनले. लोकांच्या मदतीसाठी हे हिरो धावून आले.

बॉलिवूडमधील 'हे' ५ कलाकार आहेत २०२० वर्षातील रियल लाईफ हिरो
SHARES

२०२० हे सर्वात कठीण वर्ष म्हणून म्हटलं जाऊ शकतं. कारण जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं. अनेकांचे जीव गेले. लॉकडाऊन लागू करण्यात आलं. यामुळे अनेकांचे हाल झाले. खास करून गरीब मजूरांचे आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचे. कोणाकडे खाण्यासाठी पैसे नव्हते तर कोणाकडे राहण्यासाठी घर नव्हतं.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेक जण शहर सोडून गावाला गेले. पैसे नसल्यानं बऱ्याच जणांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. अशांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागाल. या विचित्र परिस्थितीत काही 'रील लाइफ' हीरो २०२० या सालातील 'रिअल-लाइफ' नायक बनले. लोकांच्या मदतीसाठी हे हिरो धावून आले. आम्ही तुम्हाला त्यांची ओळख करुन देणार आहोत.

  • सोनू सूद

या कठीण वर्षात बॉलिवूड चित्रपटातील सर्वात खतरनाक खलनायक सोनू सूद खऱ्या आयुष्यातला नायक म्हणून उदयास आला आणि त्यानं सर्वांची मनं जिंकली. मजूरांच्या जेवणापासून ते त्यांना त्यांच्या घरी सोडण्यापर्यंत सर्व जबाबदारी त्यानं उचलली. इतकंच नाही तर सोनूनं वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी जुहू हॉटेलचे दरवाजेही उघडले.

  • हृतिक रोशन

हृतिक रोशननंही कोरोना काळात अनेकांची मदत केली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी त्यांनी मोठी रक्कम दान केली. एवढेच नव्हे तर त्यांनी COVID साठी काम करणाऱ्या पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांना PPE किट पुरवले. शिवाय हृतिकनं काम नसलेल्या १०० हून अधिक डांसर्ससाठी देणगी दिली.

  • अक्षय कुमार

अक्षय कुमारनं कोरोनाव्हायरस साथीच्या वेळी अनेकांना मदत केली. जनजागृतीपासून ते दान करण्यापर्यंत त्यांनं प्रशासनाची बरीच मदत केली. अक्षयनं PMcare मध्ये २ कोटींचा निधी दिला. त्याशिवाय मुंबई पोलिस फाऊंडेशन, पालिकेला देखील फंड उपलब्ध करून दिला. यासह, त्यानं बॉलिवूडमध्ये सर्वात मोठ्या निधी उभारणीस कार्यक्रमास हजेरी लावली.

  • सलमान खान

बॉलिवूडमध्ये दबंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला सलमान खान सुद्धा मदत करण्यात मागे राहिला नाही. कोरोनोव्हायरस साथीच्या वेळी, सलमाननं भरपूर देणगी दिली. मग ती आर्थिक असो की अन्नदान कपून असो. त्यांनी फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजमधील दररोज २ लाख लोकांची जेवणाची सोय केली. त्यानं बॉलिवूडमधील बर्‍याच स्पॉट बॉईजना मदत केली. अन्नदान करण्यासाठी त्यानं 'बीइंग हंगरी' या फूड ट्रकची सुरूवात केली आणि त्याद्वारे बर्‍याच लोकांना खायला दिले.

  • प्रभास

बाहुबली चित्रपटात काम करणाऱ्या प्रभासनंही मदत करण्यात कुठल्याही प्रकारची कसर सोडली नाही. प्रभासनं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री रिलीफ फंड आणि तेलंगणा मुख्यमंत्री रिलीफ फंड कोरोना संकट चॅरिटीला ५० लाख रुपयांची देणगी दिली. तेलगू सिनेमातील रोजनदारीवर काम करणाऱ्यांसाठी त्यानं फंड निधी केला होता. याव्यतिरिक्त, प्रभासनं पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीत ३ कोटी रुपयांची देणगी दिली. या सर्वांपेक्षा प्रभासनं इको पार्कसाठी २ कोटी रुपये दिले असून त्याचे वडील यूव्हीएस राजू गुरू यांचे नाव देण्यात येईल.हेही वाचा

२०२० मधील १०० कोटींच्या घरात मजल मारणारे ५ चित्रपट

२०२० मध्ये 'या' १० वेब सिरीज गाजल्या, तुम्ही पाहिल्या की नाही?

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा