सिंघम-3 साठी फॅन्सची धूम

  Kings Circle
  सिंघम-3 साठी फॅन्सची धूम
  मुंबई  -  

  मुंबई - अजय देवगणच्या 'सिंघम'नंतर आता 'सिंघम-3' हा चित्रपट तामिळ भाषेत 10 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. किंग्ज सर्कल येथे असलेल्या अरोरा थिएटर येथे बहुतेक तामिळ चित्रपटच प्रदर्शित होत असल्याने 'सिंघम-3' या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी येथे चाहत्यांची गर्दी पाहायला मिळाली. सिंघम 3 या चित्रपटातील अभिनेता सुरिया सिवकुमार याच्या चाहत्यांनी अरोरा थिएटर बाहेर त्याचा हार घातलेला पुतळा उभारून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. त्याचबरोबर सुरियाच्या फॅन्सने त्याच्या पुतळ्यासोबत सेल्फी काढून आपल्या आवडत्या हिरोच्या चित्रपटाचा आनंद साजरा केला. या आधीही दरवेळेस येथील तामिळ बांधव आपल्या लाडक्या रजनीकांत आणि इतर आवडत्या दाक्षिणात्य कलाकारांच्या चित्रपटाचा आनंद साजरा करत असतात.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.